• Download App
    घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक|Shabana Azmi was cheated while ordering liquor at home

    घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक

    घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.Shabana Azmi was cheated while ordering liquor at home


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.

    शबाना आझमी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सावधान ! माझी ऑनलाईन फसवणूक झालीय. मी गुरुवारी होम डिलीव्हरीसाठी ऑनलाईन ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे मी पैसेही आधीच अ‍ॅडव्हान्समध्ये दिले होते. पण अद्याप मला डिलिव्हरी मिळालेली नाही. आता तर त्या लोकांनी माझा फोन घेणंही बंद केलं आहे.



    यावर उत्तर देताना नेटकºयांनी म्हटले आहे की, मॅडम, गुगलवर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचे जे नंबर दाखवले जातात ते 99 टक्के खोटे असतात. तुमची फसवणूक झालेली नाही तर इतर ठगबाजांनी तुमची फसवणूक केली आहे. कृपया पोलिसात तक्रार दाखल करा आणि लोकांनाही याबाबत जागृत करा.

    दरम्यान, शबाना आझमी यांची फसवणूक करणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमच्या अधिकाºयांना यश आले आहे. शबाना आझमी यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली. मला फसवणारे अखेर सापडले आहेत.

    त्यांचा . मी मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमला विनंती करते की त्यांच्यावर अशी कारवाई करा जेणेकरुन ते मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणार नाहीत, असे शबाना आझमी म्हणाल्या.

    Shabana Azmi was cheated while ordering liquor at home

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा