विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : वाद कोणामध्ये होत नाहीत? सर्वांमध्येच होत असतात. पण जेव्हा या वादाचे रुपांतर हिंसेमध्ये होतं तेव्हा मात्र ते चुकीचे असते. कोल्हापूरमध्ये शेतजमिनीच्या वादातून आणि दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याच्या वादाने हिंसेचे रुप घेतले होते. लोखंडी गज, फावडे आणि काठ्यांसह मारहाण करण्यात आली होती.
Seven persons, including a gram sevak, were sentenced to 10 years hard labor in a beating case in Kolhapur
या हल्ल्यामध्ये नीलेश पाटील, सुनीता जयसिंग पाटील, युवराज सर्जेराव पाटील, हौसाबाई सर्जेराव पाटील, बाजीराव श्रीपती पाटील, लक्ष्मण बाजीराव पाटील हे जखमी झाले होते. आणि नीलेश यांनी याबाबत ग्रामसेवक सुरेश संजय पाटील आणि इतर 6 आरोपींविरुद्ध तक्रार पन्हाळा पोलिस मध्ये दिली होती.
हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेले तेव्हा या सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी बी शेळके यांनी एक महिला व ग्रामसेवकासह एकूण 7 जणांना 10 वर्ष सक्तमजुरी व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ४० फूट उंच आणि १०० फूट रुंद भव्य पोस्टर, कर्नाटक सरकराचा निषेध
सरकारी अॅडव्होकेट मंजुषा बी पाटील यांनी हे काम पाहिले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार हजर करण्यात आले होते. भक्कम पुरावा व सरकार वकील मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि सहा महिने दंड न भरल्यास सहा महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ग्रामसेवक सूरेश संजय पाटील, भाऊ सागर पाटील, संजय केरबा पाटील, अजित वसंत पाटील, भाऊ विनायक पाटील, वसंत केरबा पाटील, नकुशा ऊर्फ लक्ष्मी वसंत पाटील रा. कोतोली तालुका पन्हाळा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
Seven persons, including a gram sevak, were sentenced to 10 years hard labor in a beating case in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
- बेकायदेशीर सावकारीबाबत थेट पुणे पोलिसांना देऊ शकता माहिती ; जारी केला एक व्हॉट्सअप नंबर
- ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर
- … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी