• Download App
    महाराष्ट्रातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश । Seven IAS officers Transfer order in Maharashtra, including Praveen Pardeshi and Ranjit Kumar

    महाराष्ट्रातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

    IAS Officers Transfer Order : राज्य सरकारकडून सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी, आयएएस (1985) यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीत कुमार, आयएएस (2008) यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी फड, आयएएस (MH:2011) यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Seven IAS officers Transfer order in Maharashtra, including Praveen Pardeshi and Ranjit Kumar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य सरकारकडून सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी, आयएएस (1985) यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीत कुमार, आयएएस (2008) यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी फड, आयएएस (MH:2011) यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    भिवंडी-निजामपूर महापालिकेचे डॉ. पंकज अशिया, आयएएस (MH:2016) यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल गुप्ता, आयएएस (MH:2017) सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली यांना उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. येथे नियुक्त करण्यात आले आहे. मनुज जिंदल, आयएएस (MH:2017) सहाय्यक जिल्हाधिकारी, अटपाली उपविभाग आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भामरागड, गडचिरोली यांची जालना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मिताली सेठी, आयएएस (MH:2017) यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    Seven IAS officers Transfer order in Maharashtra, including Praveen Pardeshi and Ranjit Kumar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून