जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये बूस्टर शॉट्स द्यायला सुरुवात झाली आहे. कारण लस निर्मात्यांनी सांगितले आहे की, कोविड-19 लसीचा तिसरा डोस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेषत: काही विभागांमध्ये आवश्यक आहे. Serum Institutes CEO Adar Poonawalla Says Third dose of Covid-19 vaccine is unethical
वृत्तसंस्था
मुंबई : जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये बूस्टर शॉट्स द्यायला सुरुवात झाली आहे. कारण लस निर्मात्यांनी सांगितले आहे की, कोविड-19 लसीचा तिसरा डोस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेषत: काही विभागांमध्ये आवश्यक आहे.
अमेरिकेत बायडेन प्रशासनाने प्रत्येकासाठी दुसर्या डोसनंतर आठ महिन्यांनी तिसरा शॉट मान्य केला आहे. बूस्टर शॉट्स अनेक विकसनशील आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी परवडण्याजोगे नाहीत, हे देश अजूनही त्यांच्या लोकसंख्येला किमान एक डोस देण्यासाठीही संघर्ष करत आहेत.
भारतात सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी ‘ईटी नाऊ’ला सांगितले की, तिसरा डोस ‘अनैतिक’ आहे. अदार पूनावाला यांचे वक्तव्य त्यांच्या वडिलांनी सायरस पूनावाला यांनी केलेल्या वक्तव्याच्या काही आठवड्यांनीच आले आहे, ज्यात ते म्हणाले होते की, लसीचा तिसरा डोस ‘गरजेचा’ आहे आणि दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी दिला पाहिजे.
अदार म्हणतात, “मला वाटते की त्याच्या वक्तव्याचा अर्थ असा होता की कदाचित काही अतिसंवेदनशील भागांमध्ये बूस्टर शॉट्स गरजेचे आहेत.”
ते म्हणाले की, आतापर्यंत असा कोणताही पुरावा नाही की ज्यावरून तिसरा डोस आवश्यक आहे. त्याची अधिकृतपणे शिफारस केलेली नाही. फाइझर आणि मॉडर्नासारख्या लस निर्मात्यांनी वेळोवेळी लसीची कार्यक्षमता कमी होत असल्याचे सांगत बूस्टर शॉटसाठी जोर दिला आहे, परंतु शास्त्रज्ञांचे अद्याप यावर एकमत नाही.
भारतात टॉप एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. जे. मुलिल यांचा असा विश्वास आहे की, दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटच्या व्यापकतेसह कोविड-19 लसीचा एक शॉटदेखील बूस्टरसारखे कार्य करतो. दरम्यान, काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या लोकांना बूस्टरची आवश्यकता असू शकते.
दुसरीकडे, काही देशांना अद्याप एक डोस पूर्णपणे मिळालेला नाही, तेव्हा लसीचा तिसरा डोस देणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अदार म्हणतात, “जर इतर देशांतील लोकांना 2 डोसदेखील मिळाले नसतील, तर तिसरा डोस द्यायला सुरुवात करणे अनैतिकच आहे.”
Serum Institutes CEO Adar Poonawalla Says Third dose of Covid-19 vaccine is unethical
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले