मुंबई, : ता. २७ गेल्या तीन दिवसांपासून नकारात्मक जागतिक संकेतामुळे अत्यल्प वाढ दाखविणाऱ्या ‘सेन्सेक्स’मध्ये आठवड्याच्या अखेर १७५.६२ अंशांची वाढ झाली आणि प्रथमच तो ५६ हजारांच्या पुढे बंद झाला. त्यामुळे सोमवारी तो आणखी उच्चांक गाठणार का याबाबत गुंतवणुकदांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.Sensex crossed 56 k mrk first time in history
‘सेन्सेक्स’मधील ३० प्रमुख शेअरपैकी अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर २६६ रुपयांनी वाढून ७५७२ रुपयांवर गेला. औषधनिर्मिती क्षेत्रातील डॉ. रेड्डीज लॅब ९७ रुपयांनी वाढून ४६०१ रुपयांवर, सन फार्मा ११ रुपयांनी वाढून ७७१ रुपयांवर पोचला.
बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एअरटेल, टाटा स्टील, एचडीएफसी यांचे भावदेखील वधारले. दुसरीकडे, इन्फोसिस, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज व मारुती या शेअरचे भाव मात्र घसरले.गेले सलग चार दिवस ‘सेन्सेक्स’ ५६ हजारांना स्पर्श करून मागे येत होता; मात्र शुक्रवारी तो ५६,१२४.७२ अंशांवर बंद झाला. ‘निफ्टी’देखील ६८.३० अंशांनी वाढून दिवसअखेर १६,७०५.२० अंशांवर स्थिरावला.
Sensex crossed 56 k mrk first time in history
महत्त्वाच्या बातम्या
- इसिसविरोधात सर्वशक्तिमान अमेरिका झाली आक्रमक, काबूल विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा
- काश्मींरच्या मुद्द्यावर तालिबानने उधळळी मुक्ताफळे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा भारताला अनाहूत सल्ला
- बलात्कार करणाऱ्या नराधमांना तेलंगणप्रमाणे गोळ्या घालून ठार मारा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची वादग्रस्त मागणी
- काबूल विमानतळ तुर्कस्तानने चालवावा, तालिबानने जाहीरपणे केली मागमी, इर्दोगान यांच्या निर्णयाकडे लक्ष
- पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध थांबेना, आता सिद्धू बनले आक्रमक