• Download App
    जेष्ठ गायक मुकुंदराज गोडबोले यांचे निधन|Senior singer Mukundaraj Godbole passes away

    जेष्ठ गायक मुकुंदराज गोडबोले यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ज्येष्ठ गायक पं. मुकुंदराज गोडबोले यांचे आज दुपारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पुण्याच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी केतन आणि अभिजित ही दोन मुले, सुना, नातवंडे आहेत. Senior singer Mukundaraj Godbole passes away

    आज सकाळी विविध भारती पुणे वर त्यांनी गायलेलं ‘ गुरू एक जगी त्राता’ हे गीत श्रोत्यांनी ऐकले होते.पाच नंतर सुमारास त्यांना मुकुंदनगरच्या टिमवि परिसरातील ‘स्वर-संवाद ,’ घरी अंत्य दर्शनासाठी नेणार आहेत. त्यांनी १६ जानेवारीला वयाची ७७ वर्ष पूर्ण केली होती.



    पं.मुकुंदराज गोडबोले हे सांगली संस्थानचे राजगवई पं. दि.रा.गोडबोले यांचे चिरंजीव. मराठी रंगभूमीवरील सुविख्यात गायक नट उदयराज गोडबोले यांचे धाकटे बंधू . त्यामुळे घराण्यातूनच संगीताचा वारसा त्यांना लाभला होता.

    ‘संगीत अलंकार’ असलेल्या मुकुंदराज गोडबोले यांनी पुणे विद्यापीठाची ‘ डिप्लोमा इन म्युझिक’ ही पदविका प्राप्त केली होती.मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट स्वरराज छोटा गंधर्व यांना गुरूस्थानी मानून ‘ एकलव्या’ ,प्रमाणे त्यांची गायकी आत्मसात करुन स्वत:च्या कार्यक्रमातील नाट्यगीतातून ते त्यांच्या गायकीचे दर्शन घडवत असत. नुकताच त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.

    कृषि खात्यातील २५ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी संगीत सेवेस वाहून घेतले होते. त्यांचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही अनेक कार्यक्रम झाले असून अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.आकाशवाणी पुणे केंद्राचे ते उच्च श्रेणीचे कलाकार असून काही वर्ष आकाशवाणीच्या ऑडिशन बोर्डावर परीक्षक म्हणून काम केलं आहे.

    त्यांच्या निधनाने अतीशय प्रेमळ, वक्तशीर, काटेकोर, स्वछतेचे भोक्ते असलेल्या सहज, गोड असलेल्या एका गायकास मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.अनेक गायक-वादक कलाकारांच्या सादरीकरणाचा ते स्वत:ही अभ्यास करत होते आणि त्याबाबतचा आग्रह शिष्यांनाही करीत.

    त्यांना गायनाचा कुठलाही प्रकार गौण नव्हता.प्रत्येकातून मधुकर वृत्तीने चांगलं ते टिपण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता.त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले आहे. नुकतेच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता.

    Senior singer Mukundaraj Godbole passes away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल