• Download App
    ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास । Senior Marathi actor Kishore Nandlaskar dies due to corona In Thane

    ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

    Kishore Nandlaskar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाच्या संसर्गानंतर निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर किशोर यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. Senior Marathi actor Kishore Nandlaskar dies due to corona In Thane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाच्या संसर्गानंतर निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर किशोर यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

    दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘जिस देश की गंगा रहता है’ चित्रपटात सन्नाटाची व्यक्तिरेखा साकारून देशभरात त्यांना लोकप्रियता मिळाली होती. अभिनेता किशोर नांदलस्कर यांची प्रकृती मागच्या काही वर्षांपासून ठीक नव्हती. वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही झाल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. किशोर नांदलस्कर यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे 40 नाटकं, 30 चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये काम केले.

    किशोर नांदलस्करांबद्दल मुंबईच्या सिनेसृष्टीत एक किस्सा प्रसिद्ध आहे. ते सुरुवातीच्या काळात आपल्या घराशेजारच्या मंदिरात झोपत असत. घरात मोठ्या संख्येने सदस्य असल्याने ते मंदिरात विश्रांती घेत असत. ही बाब कुणीतरी तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना सांगितली. यानंतर देशमुखांनी ताबडतोब त्यांच्यासाठी घराची व्यवस्था केली. मंत्रालयात जेव्हा त्यांना नव्या फ्लॅटची किल्ली मिळाली तेव्हा भावुक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले होते.

    किशोर नांदलस्कर यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये ‘नाना करते प्यार’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘वासूची सासू’ ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादींचा समावेश आहे. मराठी सिनेमांत किशोर यांनी ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवली. यानंतर त्यांनी महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

    ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांतील किशोर यांच्या भूमिका प्रेक्षकांनी खूप भावल्या.

    Senior Marathi actor Kishore Nandlaskar dies due to corona In Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला