• Download App
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन, मंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास|senior congress leader Oscar fernandes passes away

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन, मंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

    विशेष प्रतिनिधी

    मंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी मंगळुरू येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. योगा करत असताना पडल्यानंतर फर्नांडिस यांना जुलै महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी तयार झाली होती. ती काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.senior congress leader Oscar fernandes passes away

    यादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार रुग्णालयात जाऊन माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य ऑस्कर फर्नांडिस यांना भेटले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.



    फर्नांडिस यांनी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून काम केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे फर्नांडिस यांनी राजीव गांधींचे संसदीय सचिव म्हणूनही काम केले आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्षही होते.

    ऑस्कर फर्नांडिस कर्नाटकच्या उडुपी मतदारसंघातून 1980 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्याच मतदारसंघातून 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये ते पुन्हा लोकसभेवर निवडून गेले. 1998 मध्ये फर्नांडिस राज्यसभेवर निवडले गेले आणि 2004 मध्ये ते पुन्हा ज्येष्ठ सभागृहात निवडले गेले.

    senior congress leader Oscar fernandes passes away

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल