• Download App
    पाॅलीसीच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणुक|Senior citizens cheated nine lakhs rupees for insurance policy

    पाॅलीसीच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणुक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे -विम्याचा हफ्ता भरावयाचा असल्याचे सांगत एका ज्येष्ठ नागरिक इसमाची साडेनऊ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी अनिल रामचंद्र रणधिर (वय-६३,रा.बिबवेवाडी,पुणे) यांनी पाेलीसांकडे तीन अनाेळखी माेबाईल धारकां विराेधात तक्रार दिली आहे.Senior citizens cheated nine lakhs rupees for insurance policy

    अनिल रणधीर हे निवृत्त असून ते घरीच असतात. अज्ञात माेबाईल धारकाने त्यांना फाेन करुन त्यांना विमा कंपनीतून बाेलत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स (म्युच्युअल फंड) या पाॅलीसीचा ४ व ५ हफ्ता अॅडव्हान्स मध्ये भरण्यास सांगुन



    तसेच पाॅलीसीचा एजंटकाेड नंबर बनविणेकरिता व मॅच्युरीटी रक्कमेवर १८ टक्के जीएसटी भरणेकरिता लागणारी रक्कम वेळाेवेळी त्यांच्याकडून ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आली. अशाप्रकारे एकूण साडेनऊ लाखांची फसवणुक करण्यात आल्याने त्यांनी याप्रकरणी पाेलीसांकडे तक्रार दिली आहे

    Senior citizens cheated nine lakhs rupees for insurance policy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !