विनायक ढेरे
नाशिक: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपचे बहुमताचे सरकार आल्यानंतर काहीच दिवसांतच देशात “असहिष्णू” वातावरण पसरल्याची हाकाटी पिटत विचारवंत साहित्यिकांनी जी अवॉर्ड वापसीची मोहीम चालवली होती, त्याचीच “लघु आवृत्ती” आज महाराष्ट्रात निघाली आहे.”Selected” marathi writers meet Uddhav Thackeray and support his faction of Shivsena
महाराष्ट्रातील “निवडक” साहित्यिकांनी बाळासाहेबांच्या नव्हे तर उद्धवजींच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. हे तेच साहित्यिक आहेत, की जे बाळासाहेब असताना शिवसेनेच्या सावलीला देखील उभे राहत नव्हते!!
उद्धव ठाकरे यांना आज भेटायला जाणाऱ्यांमध्ये अर्जुन डांगळे, कवी नीरजा, मेधा कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर आदींचा समावेश होता. एक प्रकारे हे शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला नवा “वैचारिक टेकू” लावण्यासारखेच आहे.
राष्ट्रवादीतून नेत्यांचा पुरवठा
राष्ट्रवादीतून आधीच उद्धवजींच्या सेनेला नेत्यांचा पुरवठा केला गेलाच आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांच्यासारख्या प्रवक्त्यांचा समावेश आहे आता त्या पलिकडे जाऊन निवडक साहित्यिकांना शिवसेनेच्या गोटात पाठवून राष्ट्रवादीने उद्धवजींच्या सेनेला वैचारिक पातळीवरही पुरती गुंडाळण्याचा पुढचे पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे.
या निवडक साहित्यिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे देशात “स्वातंत्र्याची गळचेपी” होते आहे, अघोषित आणीबाणी लागू आहे, वगैरे कारणे दिली आहेत. ती अर्थातच 2015 सालच्या देशभरातल्या अवॉर्ड वापसी मोहिमेचीच कारणे आहेत. यामध्ये नवे मुद्दे कोणतेच उपस्थित करण्यात आलेले नाहीत. पण उद्धवजींनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून जी “वैचारिक क्रांती” केली त्या “क्रांतीला” पाठिंबा देण्यासाठीच “निवडक” साहित्यिक त्यांच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले होते. अर्थातच या साहित्यिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेला कधीच पाठिंबा नव्हता. पण आता उद्धवजींच्या सेनेला पाठिंबा देऊन ते हिंदुत्ववादी शिवसेनेत संघटनात्मक पातळी पातळीवर आधीच पडलेल्या फुटीवर “वैचारिक पाचर” मारण्याचा प्रयत्न करत आहेत!!
“Selected” marathi writers meet Uddhav Thackeray and support his faction of Shivsena
महत्वाच्या बातम्या
- सलमान रश्दींच्या प्रकृतीत सुधारणा : व्हेंटिलेटर काढल्यानंतर बोलत होते, चाकूने वार करत झाला होता प्राणघातक हल्ला
- Vinayak Mete Profile : मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज, शिवसंग्रामचे अध्यक्ष, जाणून घ्या, दिवंगत विनायक मेटे यांच्याबद्दल
- उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल : म्हणाले- लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, सरकारे पाडण्यासाठी आहेत!
- विनायक मेटे यांचे अपघाती निधन, दिग्गज राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त