वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन एक्सप्रेस पुन्हा धावू लागली आहे. विशेष म्हणजे या गाडीला नव्या एल एच बी डब्यांसह आणि नवीन विस्टाडोम कोचही बसविला आहे. नवीन विस्टाडोम कोचचा वरील आणि दोन्ही बाजूचा भाग काचेचा आहे. त्यामुळे १८० डिग्रीत फिरत्या खुर्चीसह तुम्ही निसर्ग सौंदर्य न्याहाळू शकता. See the beauty of Lonavla, Khandala Ghat from the Vistadom coach of the Deccan Express
प्रवासी नसल्याने ही डेक्कन एक्सप्रेस काही दिवस बंद ठेवली होती. पुन्हा सुरू झालेली एक्सप्रेस आता विस्टाडोम कोचसोबत धावणार आहे. त्यामुळे खंडाळा आणि लोणावळा घाटाचे अद्भुत सौंदर्य आता अनुभवता येणार आहे.
भारतीय रेल्वेने खास काही रेल्वे मार्गांसाठी विस्टाडोम कोचची निर्मिती केली होती. महाराष्ट्रात त्यापैकी कोकण रेल्वे मार्ग आणि पश्चिम घाटातून जाणारा मुंबई पुणे रेल्वे मार्ग आहे. या दोन्ही रेल्वे मार्गावर विस्टाडोम कोचसह रेल्वे सुरू केल्या आहेत.
मुंबई पुणे रेल्वे मार्गात तर खंडाळा आणि लोणावळा असे दोन निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेले घाट येतात. त्यात मान्सूनमध्ये कडे कपारीतून फेसाळत कोसळणारे झरे, बोगद्यातून जाताना वर दिसणारे उंचच उंच डोंगर माथे, दरी खोऱ्यात दिसणारे वळणावळणाचे रस्ते सर्व काही अगदी स्पष्ट, मोठ्या काचेच्या खिडक्यांच्या मधून आणि १८० डिग्री फिरणाऱ्या खुर्च्यांवर बसून पाहायला मिळणार आहे.
या नवीन डब्यातून प्रवास करायचा असेल तर थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ७६० रुपये भरून तुम्ही या डब्यातून प्रवास करू शकता. विशेष म्हणजे या डब्याचे बुकिंग फुल्ल आहे.
See the beauty of Lonavla, Khandala Ghat from the Vistadom coach of the Deccan Express
महत्त्वाच्या बातम्या
- पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्हे तर मनेका गांधी घटिया, भाजपाच्या आमदाराचीच टीका
- काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चैतन्यमयी दृष्टीकोन , १२ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
- उज्जैनमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिराचे अवशेष
- जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा, ओमर अब्दुल्ला यांची टीका
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर