• Download App
    अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेशSection 144 enforced in Amravati city, Collector Pavneet Kaur issued a curfew order

    अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश

    दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला.राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहेSection 144 enforced in Amravati city, Collector Pavneet Kaur issued a curfew order


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे. दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला.राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे.

    आज अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. दरम्यान अमरावती आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी शहरात कलम 144 लागू केली असून जमावबंदीचे आदेश दिले आहे.



    दरम्यान संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे की , महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवणू आणली आहे.तसेच दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

    अमरावतीतल्या बंददरम्यान, दुकानं बंद केली नाहीत म्हणून आंदोलकांकडून 4 -5 दुकानांची जाळपोळ करण्यात आली. दुकानदारांवर दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली.यावेळी पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज करण्यात आला.

    Section 144 enforced in Amravati city, Collector Pavneet Kaur issued a curfew order

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस