• Download App
    तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता महायुतीत जागावाटप करू; अजितदादांचा मराठी माध्यमांना टोला!! Seat sharing will be smooth in mahayuti without giving breaking news to media, tells ajit pawar

    तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता महायुतीत जागावाटप करू; अजितदादांचा मराठी माध्यमांना टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात शरद पवारांचे पुरते वाभाडे काढल्यानंतर अजित पवारांनी मराठी माध्यमांना देखील पत्रकार परिषदेतून टोले आणले तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता आम्ही महायुतीत जागावाटप करू, असा टोला अजितदादांनी मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींना लगावला. Without giving you any breaking news, we will allocate seats in the grand alliance

    अजित पवारांनी चिंतन शिबिरात लोकसभेच्या चार मतदारसंघांची नावे घेऊन तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. या बारामती शिरूर सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघाचा समावेश होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

    पण त्यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना भाजप तर 26 जागांवर निवडणूक लढवण्याचे म्हणतो आहे. मग राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला किती जागा मिळतील??, असा सवाल केला. त्याला उत्तर देतानाच अजितदादांनी तुम्हाला कोणतीही ब्रेकिंग न्यूज न देता आम्ही महायुतीत व्यवस्थित जागावाटप करू. तुम्ही काळजी करू नका, असा टोला हाणला.

    आधी राजीनामा देऊन, नंतर आंदोलन करायला लावून शरद पवारांनी सर्वांना गाफील ठेवले; अजितदादांनी जुने वाभाडे काढले!!

    मंत्रिमंडळाचा कारभार आणि प्रशासन व्यवस्था चालवताना तुम्ही किमान समान कार्यक्रम आखला आहे, पण विचारधारेच्या मुद्द्यावर तुमचा काही किमान समान कार्यक्रम आहे का?? कारण भाजप राम मंदिराच्या दृष्टीने मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतो आहे, मग राष्ट्रवादी काँग्रेस काय करेल??, असा सवाल दुसऱ्या पत्रकाराने केला. त्यावर नितीश कुमार, मेहबूबा मुफ्ती, ममता बॅनर्जी, फारूक अब्दुल्ला हे देखील भाजपबरोबर गेले होते. मग त्यांनी त्यांची विचारसरणी बदलली का?? ते सेक्युलरच होते ना??, असा उलटा सवाल अजित पवारांनी केला.

    2014 मध्ये वरिष्ठांच्या सांगण्यावरून प्रफुल्ल पटेल यांनी बाहेर येऊन त्यावेळच्या सरकारला त्यांनी न मागताच पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. तो पक्ष देखील भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षच होता. मग आताच काय अडचण आली आहे??, असा बोचरा सवाल करून अजित पवारांनी पत्रकारांना आणि शरद पवार गटाला गप्प केले.

    Without giving you any breaking news, we will allocate seats in the grand alliance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ