विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्सने नकार दिला आहे.लहान मुलांसाठी अद्याप देखील वातावरण अनुकूल नाही. लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नाही, असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलंय. शिक्षण विभाग पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्यास अनुकूल असलं तरी टास्क फोर्सनं मात्र विरोध केलाय. Schools Reopen: third wave ? Whats the opinin of task force about opening of pre school?
तिसरी लाट येणार?
मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी अधिक असल्याचं डॉ. ओक यांनी सांगितलं.लसीकरण झालेली मुलं शाळेत यायला हवीत. केंद्र सरकरने आता लवकरात लवकर लहान मुलांचं लसीकरण सुरू करावं, असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केलं. मास्क ही पहिली लस आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात लोकांनी मास्क टाळला. यामुळेच तिसरी लाट येणार नाही असं म्हणता येत नाही.
अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण इतकं वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले.
मुंबईत लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिबॉडिज आढळले आहेत. जी परिस्थिती एप्रिल 2021 होती. आता टीव्हायरल औषध आहेत, मोनोक्लोमल अँटीबॉडीज आहेत. भारताने सगळ्यात आधी डेल्टा व्हेरिएंटचा सामना केला. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो नाही, पण त्यांच्या डॉक्टरांशी बोललो. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची मुदत राज्य सरकारने दिली आहे.
शाळा सुरु करण्यास महापालिका अनुकूल
- शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं कळवलंय.
- अनलॉकनंतर, सार्वजनिक ठिकाणी गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील कोविड केसेस नगण्य आहेत. त्यामुळे, बगिचे, क्रिडांगणे, बाजार याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे महापालिकेचे मत आहे.
- मात्र कोविड टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार लहान मुलांचे लसीकरण सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे.
Schools Reopen : third wave ? Whats the opinin of task force about opening of pre school?
महत्त्वाच्या बातम्या
- प्रदूषणामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागते, नागरिकांनी प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ
- पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अॅमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागविले, कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा आरोप्
- झंडा ऊंचा रहे हमारा, १५ हजार फूट उंचीवर ७६ फूट उंचीचा तिरंगा फडकला
- अब्जाधिशाची विकृती, पाच हजार महिलांशी शरीरसंबंध ठेवले आणि नावांची यादीही तयार केली
- शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभार