विशेष प्रतिनिधी
मुंबई:1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्सने यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे.SCHOOLS REOPEN: Big decision of Maharashtra government! The first to fourth schools will also start from December 1
पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाकडून पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता,
मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
लवकरच शाळा सुरू केल्या जातील असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. आता त्याच प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातली नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे.
SCHOOLS REOPEN: Big decision of Maharashtra government! The first to fourth schools will also start from December 1
महत्त्वाच्या बातम्या
- 6G NETWORK : Good News ; भारताकडे पुढील 2 वर्षात स्वतचं 6G नेटवर्क ; दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला संपूर्ण प्लॅन तयार
- Asia’s Richest Person : गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ! रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना टाकले मागे
- No Vaccine No Salary : नागपूर महापालिकेचा कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश
- UP Election 2022 : कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंह आणि वंदना सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश!