अजित पवार म्हणाले की , निर्बंधांबाबत जर तुम्ही सरकारचं ऐकलं नाही तर याबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल.’Schools are closed now so that children are not harmed’ – Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहराच्या स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत दरम्यानशहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालकांना गंभीर इशारा दिला आहे.यावेळी पवार म्हणाले की , निर्बंधांबाबत जर तुम्ही सरकारचं ऐकलं नाही तर याबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल.
पालक आपल्या लहान मुलांना सध्या हॉटेल्स किंवा मॉलमध्ये गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत.दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याबाबत काही नियमावली जाहीर होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं.
पुढे पवार म्हणाले, “मुख्यमत्र्यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आपण सध्या शाळा बंद ठेवल्या आहेत. मुलांना त्रास होऊ नये यासाठी आपण या गोष्टी केल्या आहेत पण जर त्यांच्या पालकांना ऐकायचंच नसेल तर या आठवड्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काय निर्मण घ्यायचा तो घेऊ”
‘Schools are closed now so that children are not harmed’ – Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवणे पडले महागात , पुणे विमानतळावरुन जम्मू काश्मीरच्या तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक
- Goa Election : दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या सुपुत्राला आधी शिवसेनेची आता आपची ऑफर; केजरीवाल गोव्यात, उत्पल पर्रीकरांना पक्षात येण्याचे निमंत्रण
- पूर्वीचे पालिका कारभारी चमच्याने खायचे, आताच्या सत्ताधाऱ्यांनी पातेले तोंडाला लावले, आम आदमी पक्षाचा आरोप
- ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या महाविकास आघाडी प्रस्तावाला शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्केंकडून सुरुंग!!