• Download App
    Scholarship Exam : महत्वाची बातमी! उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर रद्द ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय । Scholarship Exam: Important News! Scholarship exam to be held tomorrow finally canceled! A big decision of the education department

    Scholarship Exam : महत्वाची बातमी! उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर रद्द ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

    शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता.


    या दरम्यान, बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित तारखेला खाजगी अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व मंडळाच्या शाळांमध्ये नियाेजित तारखेला परीक्षा घेतली जाणार असल्याचे पत्र काढण्यात आले.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिक्षण विभागाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी) परीक्षा गुरुवारी (१२ ऑगस्ट) घेण्याचे ठरविले हाेते. पण काेविड प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द केल्याचे बुधवारी उशीरा जाहीर केले. Scholarship Exam: Important News! Scholarship exam to be held tomorrow finally canceled! A big decision of the education department

    शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता. या दरम्यान, बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित तारखेला खाजगी अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व मंडळाच्या शाळांमध्ये नियाेजित तारखेला परीक्षा घेतली जाणार असल्याचे पत्र काढण्यात आले.



    यामुळे रात्री उशीरापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पालक व शिक्षकांमध्ये गाेंधळ सुरु हाेता. यात शिक्षक परिषद संघटनेने बुधवारी दिवसभर परीक्षा रद्द करण्याबाबत मुंबई उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला. ज्यामुळे अखेर रात्री उशीरा परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने घाेिषत केले.

    अखेर मुंबईतील सर्वांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द -शिक्षक परिषदेचे यश

    मुंबई मनपा आयुक्तांनी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरक्षा व आरोग्याच्या कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये इतर शाळांच्या विद्यार्थ्यांबाबत विचार केला नव्हता. शिक्षक परिषदेने याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला होता.

    बुधवारी सकाळपासून शिक्षक परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार व्हावा. याबाबत मागणी केली होती. याला यश आले आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

    Scholarship Exam: Important News! Scholarship exam to be held tomorrow finally canceled! A big decision of the education department

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!