प्रतिनिधी
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत, तर त्या ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी काल महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेले दिसले. मुंबई, अकोला, नागपूर, औरंगाबाद, लातूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन भडकावणल्याचा आरोप ठेवून हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे scam of online exam
मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानासमोर हजारो विद्यार्थ्यांनी जमून मोठे आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीमार केला. या लाठीमारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून पोलीसांनी याबाबत हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक नावाच्या सोशल मीडिया हँडलरला दोषी ठरवले आहे. त्याला आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अकरा वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पण या अटकेच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत ऑनलाईन किंवा ऑफलाईन याचा निर्णय कधी होणार असा सवाल विद्यार्थी आता विचारत आहेत.
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठक याला काल पोलिसांनी धारावीतून बाजूला काढले होते. तो विद्यार्थ्यांचे नेतृत्व आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु, हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक याला आंदोलन स्थळापासून बाजूला केल्यानंतरच विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता.
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाला असून पोलिसांना आंदोलनाची पूर्वकल्पना कशी काय नव्हती?, अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलीस लाठीमार कसे करू शकतात?, यामागे नेमके कोणाचे आदेश आहेत?, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. तर ठाकरे – पवार सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मागे अन्य कुणी समाजकंटक आहेत का?, याचा तपास केला जाईल, असे म्हटले आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्यावात किंवा कसे याचा आढावा 15 फेब्रुवारी नंतर घेण्यात येईल, असे म्हटले होते. याच मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढला. शिक्षण ऑनलाइन झाले आहे तर परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती.
हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक याला पोलिसांनी बाजूला केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणी मध्ये हिंदुस्थानी भाऊला सोडा, अशी भर पडली. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेच्या मागणीपेक्षा त्यांच्यावर झालेला लाठीमार आणि हिंदुस्थानी भाऊ या विषयावर आता सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनी लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामाग समाजकंटक असल्याचा दावा केला आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर राज्य राजकीय घमासान सुरू झाले आहे.
आता हिंदुस्तानी भाऊला अटक झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
scam of online exam
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान
- वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत
- पाकिस्तानी मौलवीच्या विखारी व्हिडीओमुळेच मुस्लिम मारेकऱ्यांकडून हिंदू तरुणाची हत्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप