• Download App
    Scam in power purchase in the state, while getting electricity

    राज्यात वीज खरेदीत मोठे गौडबंगाल, तीन-चार रुपये दराने वीज मिळत असताना २० ते २१ युनिट दराने ऑनलाईन खरेदी

    एका बाजुला राज्यात भारनियमन सुरू करून शेतकऱ्यांची छळवणूक मांडली असताना वीज खरेदीत मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. तीन ते चार रुपये दराने वीज मिळत असताना ऑनलाईन ट्रेडींगमध्ये २० ते २१ रुपये दराने घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Scam in power purchase in the state, while getting electricity


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : एका बाजुला राज्यात भारनियमन सुरू करून शेतकऱ्यांची छळवणूक मांडली असताना वीज खरेदीत मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. तीन ते चार रुपये दराने वीज मिळत असताना ऑ नलाईन ट्रेडींगमध्ये २० ते २१ रुपये दराने घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



    नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याला पीक अवरमध्ये साधारणत: आठ ते नऊ हजार मेगावॅट वीज लागते. राज्यात वीज सरप्लस असताना वीज खरेदीत मात्र मोठे गौडबंगाल आहे, असा असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. ते म्हणाले, ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये तब्बल २० ते २१ रुपये युनिट दराने वीज खरेदी करण्यात येत आहे. त्याचा सर्व बोजा गोरगरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे.

    ३ ते ४ रुपये युनिटने अनेक खासगी कंपन्या वीज देण्यास तयार आहेत; परंतु सरकार त्यांच्यासोबत कायम करार करीत नाही. खासगी वीज कंपन्या मंत्रालयात खेटे मारत आहेत; परंतु जादा दराने वीज खरेदी करून त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर मारण्याचा उद्योग सुरू आहे.

     

    Scam in power purchase in the state, while getting electricity

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना