Vijay Mallya Loan : फरार मद्य व्यावसायिका विजय मल्ल्याच्या कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्ल्याच्या अनेक मालमत्ता अटॅच केल्या होत्या. आता त्या विकून बँकांचे कर्ज वसूल केले जात आहे. त्यापैकी एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँक कन्सोर्टियमला 5,800 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाले आहेत. sbi led bank consortium gets over 5800 crore rupee in vijay mallya loan default case says enforcement directorate
विशेष प्रतिनिधी
मुंबई : फरार मद्य व्यावसायिका विजय मल्ल्याच्या कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्ल्याच्या अनेक मालमत्ता अटॅच केल्या होत्या. आता त्या विकून बँकांचे कर्ज वसूल केले जात आहे. त्यापैकी एसबीआयच्या नेतृत्त्वाखालील बँक कन्सोर्टियमला 5,800 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाले आहेत.
यूबीएलचे समभाग जप्त केले होते
विजय मल्ल्याच्या प्रकरणात मनी लाँडरिंगची चौकशी करत असताना ईडीने अनेक मालमत्ता अटॅच केल्या होत्या. यामध्ये मल्ल्याची कंपनी युनायटेड ब्रूव्हरीज लिमिटेड (यूबीएल) च्या शेअर्सचा समावेश होता. ईडीने अलीकडेच हे शेअर्स विकले आणि त्यातील रकमेपैकी 5,824.5 कोटी रुपये एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक कन्सोर्टियमला परत केले.
डीआरटीने 23 जून रोजी शेअर्सची विक्री केली
मल्ल्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणातील सुनावणी असलेल्या विशेष कोर्टाने ईडीला 6,624 कोटी रुपयांचे यूबीएलचे शेअर्स एसबीआयच्या नेतृत्वात असलेल्या बँक कन्सोर्टियमकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. यानंतर ईडीने हे शेअर्स बँक गटाकडे वर्ग केले. आणि नंतर 23 जून रोजी विवाद निवारण न्यायाधिकरणाने (डीआरटी) हे शेअर्स विकले. स्वत: ईडीने ट्वीट करून ही माहिती दिली.
उर्वरित सुमारे 800 कोटी रुपयांचे शेअर्स 25 जून रोजी विकणे अपेक्षित होते. याद्वारे एसबीआय कन्सोर्टियमकडून प्राप्त झालेल्या रकमेची माहिती नंतर बाहेर येऊ शकेल. विशेष म्हणजे विजय मल्ल्याने अनेक बँकांकडून कर्ज घेऊन ते बुडवले होते. मल्ल्यावर विविध बँकांचे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सध्या मल्ल्या लंडनमध्ये आहे आणि भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी तिथल्या कोर्टात खटला चालवित आहे.
मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याकडून 40% वसुली
ईडीने बुधवारी निवेदनात म्हटले की, फरार उद्योजक विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी गहाळ झालेल्या पैकी 40% रक्कम वसूल झाली आहे. ईडीचे म्हणणे आहे की, या प्रकरणात तातडीने कारवाई केल्याने आणि मालमत्ता द्रुतगतीने जप्त केल्यामुळे हे शक्य झाले आहे.
sbi led bank consortium gets over 5800 crore rupee in vijay mallya loan default case says enforcement directorate
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले – संघर्ष कधी अन् संवाद कधी हे ज्याला कळतं तोच खरा नेता!
- Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स
- OBC आरक्षणासाठी राज्यभरात भाजपची आंदोलनं; फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात
- OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांनी काढली ठाकरे सरकारची खरडपट्टी, वाचा सविस्तर…
- १०० कोटींचे प्रकरण : शिंदे, पलांडे या दोन्ही स्वीय सहायकांना अटक, देशमुखांवर अटकेची टांगती तलवार