विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय स्त्रीशक्ती जागरणच्या वतीने नुकताच ‘सावित्री महिला जागृती मेळावा’ घेण्यात आला. नवीन मराठी शाळेच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात प्रेरणादायी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव सुनिती पारुंडेकर उपस्थित होत्या.
एकपात्री कलाकार दीपाली कात्रे यांनी सावित्रीबाईंची धैर्यशाली आणि संघर्षमय वाटचाल सादर केली. डान्स अकॅडेमीच्या नृत्यांगनांनी ‘रान मोकाट वारं सोसाट’ या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. संध्या कुलकर्णी यांच्या सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव गीताने केला, तर मेघना जोग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ओव्या सादर केल्या. संध्या कुलकर्णी यांच्या स्फूर्ती गीताने
कार्यक्रमाची सुरुवात झाली.
“Women on Wheels” या संकल्पनेअंतर्गत पारंपरिक चौकटी मोडून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या चार महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर चालवणाऱ्या रश्मी ठोसर, रिक्षा ते कॅब चालक म्हणून वाटचाल करणाऱ्या शीतल सातपुते , पुणे मेट्रोच्या लोको पायलट पूजा काळे आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट या बाईक वरून ६ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या आयटी अभियंता ऐश्वर्या मराठे नगरकर यांचा समावेश होता. या महिलांनी आपल्या संघर्ष, धाडस आणि यशाच्या कथा सांगताना महिला सर्व क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला.
शीतल यांनी शैक्षणिक कमतरतेमुळे रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांच्या मेहनतीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी कॅब व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
पुणे मेट्रोच्या पायलट पूजा काळे यांनी लोको पायलट होण्यासाठी आवश्यक असलेली कठोर निवड प्रक्रिया आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी या विषयी माहिती दिली. तर रश्मी ठोसर यांनी पतीच्या प्रोत्साहनाने शेती व्यवसायात ट्रॅक्टर चालवायला शिकल्याचे सांगितले. ऐश्वर्या यांनी जिद्द, शिस्त आणि नियोजनाच्या जोरावर ६ हजार किलोमीटरटचा बाइक प्रवास पूर्ण केला. हा प्रवास विक्रमासाठी नसून भारताचे सौंदर्य ड्रोन चित्रणातून जगासमोर आणण्याच्या उद्देशाने केल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी बर्वे यांनी गायलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्ष कीर्ती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा नातू यांनी सूत्रसंचालन केले.
Savitri Women’s Awareness Meet organized by Bharatiya Stree Shakti Jagran.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण वाचवायच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानावर!!
- Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला
- Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी गायडेड-पिनाका रॉकेट प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला; आर्मेनियालाही निर्यात होणार
- नितीन नवीन बॉस, मी कार्यकर्ता; पंतप्रधान मोदींनी एका वाक्यात अधोरेखित केला भाजप मधला Generational Change!!