• Download App
    घराणेशाहीत अडकलेल्यांनाच सावरकरांचे वावडे; मुख्यमंत्र्यांचे शरसंधान; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रथमच सावरकर जयंती साजरी!!|Savarkar's vows only to those stuck in dynastic rule; Sharsandhana of the Chief Minister; Savarkar Jayanti celebrated for the first time in Delhi's Maharashtra Sadan!!

    घराणेशाहीत अडकलेल्यांनाच सावरकरांचे वावडे; मुख्यमंत्र्यांचे शरसंधान; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रथमच सावरकर जयंती साजरी!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : घराणेशाहीत अडकलेल्या आणि वीर सावरकर यांचे वावडे असणाऱ्या पक्षांनी संसदेच्या नवीन वास्तूच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे, हे देश पाहत आहे. काही लोकांना सावरकर यांचे वावडे आहे आणि त्यांच्या जयंती निमित्ताने अशा कार्यक्रमाचे आयोजन होत आहे त्याचे त्यांना वावडे आहे. पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५व्या क्रमांकावर आणल्याबद्दल अनेकांना पोटदुखी होत आहे. त्यांना देशाची जनता जमाल गोटा देईलच. महाराष्ट्र सरकार वीर सावरकर यांची जयंती गौरव दिन म्हणून साजरा करत आहे, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.Savarkar’s vows only to those stuck in dynastic rule; Sharsandhana of the Chief Minister; Savarkar Jayanti celebrated for the first time in Delhi’s Maharashtra Sadan!!



    दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रथमच सावरकर जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण प्रथमच आग्र्याला केली आणि वीर सावरकर यांची जयंती प्रथमच महाराष्ट्र सदनात करत आहोत ही अभिमानाची आहे. वीर सावरकर हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महान योगदान आहे. त्यांचे संसदेत तैलचित्र लावले आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनांचे उदघाटन होते ही सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. ही अतिशय ऐतिहासिक वास्तू विक्रमी वेळेत उभी केली. नव्या वास्तूत लोकशाही अधिक वृद्धिंगत होईल असा विश्वास वाटतो. पंतप्रधान मोदी यांनी उदघाटनाच्या कार्यक्रमाची भक्तिभावाने सुरुवात केली. काही लोक या कार्यक्रमावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेत आहेत हे दुर्दैव आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    Savarkar’s vows only to those stuck in dynastic rule; Sharsandhana of the Chief Minister; Savarkar Jayanti celebrated for the first time in Delhi’s Maharashtra Sadan!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस