• Download App
    Savarkar's religious reforms : धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको!! । Savarkar's religious reforms: Don't reject Shrutismritipuranokta, but also Koranokta and Biballokta to crush Dharmaveda !!

    Savarkar’s religious reforms : धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेले काही दिवस देशात हिजाब प्रकरणावरुन वातावरण पेटले आहे. ज्याठिकाणी शिक्षण हा एकमेव धर्म पाळला जायला हवा, त्या शिक्षण संस्थांमध्ये जातीय धर्माचा शिरकाव करण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. यावरुन अनेक वाद-प्रतिवाद होत आहेत. पण धर्म हा आपल्या घराची सीमा ओलांडतो तेव्हा त्याचे होणारे दुष्परिणाम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजाला पटवून दिले आहेत. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधून ही बाब अधिक अधोरेखित होते. Savarkar’s religious reforms: Don’t reject Shrutismritipuranokta, but also Koranokta and Biballokta to crush Dharmaveda !!

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा शनिवार 26 फेब्रुवारी रोजी 56वा आत्मार्पण दिन आहे. एक प्रखर राष्ट्रभक्त म्हणून सावरकरांची संपूर्ण जगात ओळख आहे. पण त्यासोबतच समाजसुधारणेसाठी देखील सावरकरांनी फार मोठे कार्य केले आहे. धर्म आणि धर्मग्रंथ याबाबत सावरकरांनी कायमंच आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे विचार हे आजही आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.



    धर्मग्रंथ सुधारणेचे कट्टर शत्रू बनू शकतात

    धर्म हा आपल्या घरात ठेवा, असे म्हणणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माचे स्तोम माजवणा-यांच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले आहे. आपल्या विज्ञाननिष्ठ निबंधांमध्ये त्यांनी धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी विज्ञानाचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे. धर्मग्रंथ जेव्हा प्रथम रचले जातात तेव्हा ते बहुधा कोणती तरी एक सुधारणा घडवून आणण्यासाठीच रचलेले असले तरी ते लवकरच भावी सुधारणेचे कट्टर शत्रू बनतात, असे सावरकरांनी म्हटले आहे.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला असला तरी कुठल्याच धर्माचे अवडंबर त्यांना मान्य नव्हते. धर्म हा प्रत्येकाने घरात पाळावा, तो रस्त्यावर आणू नये हे सांगतानाच मुस्लिम आणि ख्रिश्चन आपल्या धर्माचा आग्रह सोडणार असतील, तर मी सुद्धा हिंदुत्वाचा आग्रह धरणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. धर्मिक कर्मकांडाचा पगडा कमी होणार नाही तोपर्यंत बुद्धीचा वापर केला जाणार नाही. आणि त्यामुळे कोणत्याच धर्मियांची प्रगती होणार नाही.

    तो अधिकार समाजाचा, धर्मग्रंथांचा नाही

    ज्या रुढींना, परंपरांना शास्त्राचा आणि विज्ञानाचा आधार नाही त्या सर्व रुढी, परंपरा मोडून काढल्या पाहिजेत. आज काय योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे, धर्मग्रंथांचा नाही, श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको, असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. शाळा हे विद्येचे घर आहे. त्यामुळे तिथे आपल्या घरातील धर्म आणणे हे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या या मताचा आधार हा नक्कीच देता येईल.

    Savarkar’s religious reforms: Don’t reject Shrutismritipuranokta, but also Koranokta and Biballokta to crush Dharmaveda !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!