Friday, 9 May 2025
  • Download App
    महाराष्ट्रा बाहेरच्या गणेशोत्सवात सावरकरांची क्रेझ!!; भडोच मध्ये साकारले वीर विनायक!!Savarkar's craze in Ganeshotsav outside Maharashtra

    महाराष्ट्रा बाहेरच्या गणेशोत्सवात सावरकरांची क्रेझ!!; भडोच मध्ये साकारले वीर विनायक!!

    विनायक ढेरे

    नाशिक : सार्वजनिक गणेश उत्सवात विविध राजकीय नेत्यांची क्रेझ असणे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे वैशिष्ट्य आहेच… मध्यंतरीच्या काळात नेत्यांची क्रेझ कमी होऊन सिनेमाच्या हिरोंची क्रेझ वाढली होती, पण आता पुन्हा राजकीय नेत्यांची त्यातही स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी राजकीय नेत्यांची क्रेझ वाढलेली दिसत आहे. Savarkar’s craze in Ganeshotsav outside Maharashtra

    कर्नाटकात बंगलोर, मेंगलोर, उडूपी आदी शहरांमध्ये 2022 मधील गणेश उत्सवात 300 हून अधिक मंडळांनी सावरकरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनी भरवली आहे, तर गुजरात मधल्या भडोच मधील टायगर ग्रुप नर्मदानगर मित्र मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय स्मारकात असलेल्या पुतळ्याची प्रतिकृती गणेशाच्या रूपात साकारली आहे. सावरकर खुर्चीवर बसून भाषणे करत असत. त्यावेळी त्यांचा हात आणि उंचावलेले बोट अशी लकब असे. तशाच रूपात गणेश मूर्ती मंडळांनी साकारली आहे.

    आत्तापर्यंत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रूपात गणपती साकारलेले दिसले आहेतच, परंतु आता सावरकरांच्या रूपातला गणेश भडोच मध्ये टायगर ग्रुप नर्मदा नगर मित्र मंडळाच्या मंडपात विराजमान झाला आहे. त्याचबरोबर मंडळाने सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग देखाव्याच्या रूपाने साकारले आहेत. हा देखावा पाहण्यासाठी गुजरात बरोबर महाराष्ट्रातील गणेश भक्तही गर्दी करत आहेत.

    Savarkar’s craze in Ganeshotsav outside Maharashtra

    Related posts

    Operation sindoor : पाकिस्तानच्या प्रत्यक्ष सशस्त्र हल्ल्यांपेक्षा फेक न्युजचे हल्ले जास्त, पण भारताचे दोन्ही हल्ल्यांना वेळीच चोख प्रत्युत्तर!!

    IND vs PAK : ‘प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर देऊ…’ जयशंकर यांनी पाकिस्तान हल्ल्यादरम्यान अमेरिका, युरोपियन युनियन आणि इटलीला सांगितले

    Vikram Misri : परराष्ट्र मंत्रालयाची दुसरी पत्रकार परिषद, मिस्री म्हणाले- दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाक सैन्याचे काय काम?