विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या ऐन भरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आयते कोलीत दिल्याची टीका सामनाच्या अग्रलेखात केली आहे. Savarkar issue : Rahul Gandhi misfired solvo at BJP, but Shivsena took chance of targeting Rahul Gandhi
पण हा अग्रलेख नीट वाचला आणि त्यातले “बिटवीन द लाईन्स” समजून घेतले, तर राहुल गांधींनी फक्त भाजपच्याच हातात आयते कोलीत दिले असे नाही, तर ते आपला सध्याचा मित्र पक्ष असलेला असलेल्या शिवसेनेच्याही हातात दिले हे लक्षात येईल. कारण सावरकरांच्या अपमानाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राहुल गांधींवर राहुल गांधींना आयते ठोकण्याची संधी मिळाली, ती एरवी मिळाली
नसती.
कारण सावरकरांचा अपमान केल्यानंतर भाजप आपल्या अंगावर येणार हे राहुल गांधींना माहिती नव्हते, असे समजणे राजकीय खुळेपणाचे लक्षण ठरेल. किंबहुना ज्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात टीआरपीच मिळत नव्हता, त्याला कारणीभूत महाविकास आघाडीतलेच पक्ष होते. दस्तूरखुद्द सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातली सुटका, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेचा केलेला विनयभंग हे विषय जोरात सुरू असताना राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला माध्यमांमध्ये टीआरपी मिळत नव्हता. तो टीआरपी मिळवण्याची राजकीय युक्ती म्हणून राहुल गांधींनी महाराष्ट्रात असताना सावरकरांचा अपमान करणारे वक्तव्य केले.
- Savarkar Bombay Council : सावरकर जेव्हा मुंबई प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छित होते…!!
एक प्रकारे सावरकरांचा तथाकथित माफीनामा हे राजकीय हत्यार बनवले. असे असताना सामनाच्या अग्रलेखामध्ये मात्र राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात भरघोस स्वागत झाल्याचे म्हटले आहे. पण ही वस्तुस्थिती नव्हती हेच तर राहुल गांधींच्या सावरकरांचा अपमान करण्याच्या राजकीय कृतीतून दिसून आले होते. हे विश्लेषण सामनाने केले नाही, तर उलट राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य करण्याची गरज नव्हती, शरसंधान साधण्याची संधी संजय राऊत यांनी घेतली. याचाच अर्थ राहुल गांधींनी फक्त भाजपच्या हातात आयते कोलीत दिले असा होत नाही, तर ते शिवसेनेच्याही हातात आयते दिले असा होतो आहे. कारण शिवसेनेलाही राहुल गांधींना डिवचण्याची या निमित्ताने संधी मिळाली आहे आणि महाविकास आघाडी तुटू शकते, असा इशारा देण्याची संधी मिळाली आहे.
भाजपचे सावरकर प्रेम बेगडी आहे. शिंदे गटाला मिंधे गट म्हणून त्यांचेही सावरकर प्रेम बेगडी आहे असे सामनाच्या अग्रलेखात ठोकण्यात आले आहे. सावरकरांना अद्याप भारतरत्न दिलेला नाही हे तर खरेच. पण म्हणून सावरकरांचे भाजपचे सावरकर प्रेम बेगडी असेल, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सावरकर प्रेम तरी किती शुद्ध आहे??, हा खरा प्रश्नच आहे. कारण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे संजय राऊत यांनी तोंडी म्हटले, आदित्य ठाकरे तर त्याविषयावर कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललेही नाहीत. पण काँग्रेसच्या ज्या शिदोरी मासिकात सावरकरांच्या बद्दल अश्लील लेख छापून आला, त्यावर फक्त सामनातून आगपाखड करण्याशिवाय आणि चॅनेलला बाईट देण्याशिवाय दुसरे काहीच केले नव्हते. म्हणजे एकीकडे काँग्रेसची सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची राजकीय सलगी करायची आणि दुसरीकडे भाजपच्या सावरकर प्रेमाला बेगडी म्हणायचे, असा हा दुटप्पी राजकीय व्यवहार आहे.
पण हे काही असले तरी भारत जोडो यात्रेत सावरकरांचा अपमान करून राहुल गांधींनी भाजपच्या हातात आयते कोलीत दिले असे म्हणणाऱ्या शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून त्यांना ठोकून प्रत्यक्षात ते आपल्याच हातात अनायसे लागल्याचे सिद्ध केले आहे!!
Savarkar issue : Rahul Gandhi misfired solvo at BJP, but Shivsena took chance of targeting Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S प्रक्षेपित; वाचा वैशिष्ट्ये
- सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि नंतर : उद्धव गटाची मध्यावधी निवडणुकीची पेरणी, ते आता महाविकास आघाडीत फुटीचा इशारा
- एसईबीसी उमेदवारांना आर्थिक दुर्बल आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- भगवान श्रीकृष्णाच्या बेट द्वारकेत 6.50 कोटींच्या जमिनीवर कब्जा; मशिदी, मजारींचे बांधकाम; 40 % अतिक्रमणांवर बुलडोझर