• Download App
    Savarkar insult issue : rahul Gandhi came to surat for Court case got bail, but didn't hold press conference

    राहुलजींच्या कोर्ट केस निमित्त सुरत मध्ये काँग्रेसचा हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; महाराष्ट्रातून नाना, भाई, यशोमती ठाकूरांची कुमक!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा झालेल्या राहुल गांधींच्या जामीन वाढविण्यासंबंधीच्या अर्जावर आज सुरत सत्र न्यायालयात जी सुनावणी झाली, ती अवघ्या काही मिनिटांची होती. पण तेवढ्या अल्पावधीच्या सुनावणीसाठी राहुल गांधी नवी दिल्लीहून प्रियांका गांधी यांच्यासह खास चार्टर्ड प्लेनने सुरतला आले. जामीन मिळवला आणि प्रेस कॉन्फरन्स न घेताच एक ट्विट करून ते निघून गेले. Savarkar insult issue : rahul Gandhi came to surat for Court case got bail, but didn’t hold press conference

    राहुल गांधींच्या केसच्या निमित्ताने काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि बडे माजी मंत्री, नेते यांच्यासह काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी सुरत कोर्टाच्या परिसरात मोठे शक्तिप्रदर्शन केले. सुरत कोर्टातली सुनावणी अवघ्या काही मिनिटांमध्ये संपली. राहुल गांधींना 13 एप्रिल पर्यंत जामीन वाढवून मिळाला. राहुल गांधींच्या खासदारकी रद्द करण्यासंदर्भातल्या केसची पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. सुरत कोर्टाच्या एवढ्याच विशिष्ट कामासाठी राहुल गांधी यांच्या सुरत – दिल्ली प्रवास आणि काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन या भोवती सर्व बातम्या फिरल्या.

    राहुल गांधी कोर्टातल्या सुनावणीसाठी कोर्टातल्या काही मिनिटांच्या सुनावणीसाठी दिल्लीहून सुरतला आले. सुनावणी होताच तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना हात हलवून अभिवादन करत निघूनही गेले. त्यांनी सुरत मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही त्या ऐवजी फक्त एक ट्विट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात राहुल गांधींच्या या हालचालीची मोठी चर्चा सुरू आहे.

    राहुल गांधींच्या आगमनापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली. पण राहुल गांधींनी मात्र सुरत मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणे असे टाळले आणि फक्त एक ट्विट केले.

     सावरकर वादाचा धसका

    सुरत कोर्टाचा दोन वर्षांच्या शिक्षेचा निकाल आणि त्यानंतर रद्द झालेली खासदारकी या मुद्द्यावर राहुल गांधींनी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तब्बल 50 मिनिटे चाललेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींना आपण माफी मागणार का??, असा एक प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांनी फक्त एक वाक्य उच्चारले. मेरा नाम राहुल गांधी है. राहुल सावरकर नही. गांधी किसी से माफी नही माँगता!! बस्स एवढे एकच वाक्य… पण अख्ख्या 50 मिनिटांच्या प्रेस कॉन्फरन्स वर बोळा फिरवून गेले.

     उद्धव ठाकरेंचा दम

    वास्तविक राहुल गांधींनी त्यामध्ये अनेक मुद्दे मांडले होते. पण आपण सावरकर नाही. गांधी आहोत आणि गांधी माफी मागत नाही, एवढेच त्यांचे वाक्य प्रचंड वाद तयार करून गेले. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याने काँग्रेसला दम भरला. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा तो दम होता. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. अखेरीस शरद पवारांना मध्यस्थी करून राहुल गांधी आणि सोनिया गांधींची “समजूत” काढावी लागली. सावरकरांच्या विषयावर नमते घेत काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले.

     राहुल गांधींचे एकच ट्विट

    त्यावेळी राहुल गांधींच्या 50 मिनिटांच्या प्रेस कॉन्फरन्स मधल्या फक्त एका वक्तव्याने एवढा मोठा फरक पडला. याचाच कदाचित धसका घेतल्याने सुरत कोर्टातील आजच्या घडामोडींनंतर राहुल गांधींनी सुरत मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे टाळले. कारण सुरत मध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, तर पत्रकारांनी नक्की त्यांना सावरकर मुद्द्यावर प्रश्न विचारले असते आणि आणि त्या प्रश्नाला त्यांना काहीतरी उत्तर द्यावे लागले असते. सावरकरांबद्दलच्या प्रश्नावर राहुल गांधींनी कोणतेही उत्तर दिले असते तर त्यातून नवा वाद निर्माण झाला असता. त्यापेक्षा प्रेस कॉन्फरन्स टाळून राहुल गांधी यांनी एकच ट्विट करून दिल्लीला निघून जाणे पसंत केले. पण पण त्यामुळेच राहुल गांधींचे सुरतला येणे आणि एकच ट्विट करून निघून जाणे हे सावरकर वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरले आहे.

    Savarkar insult issue : rahul Gandhi came to surat for Court case got bail, but didn’t hold press conference

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!