प्रतिनिधी
नाशिक : संजय राऊत यांचे थुंकी पुराण काही थांबायला तयार नाही. संजय राऊत यांच्या घसरत्या जिभेवर आता सावरकरांचे नाव आले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव पत्रकाराने प्रश्न विचारताना घेतल्यानंतर संजय राऊत थुंकले होते. त्याचे समर्थन आज त्यांनी नाशिक मध्ये केले. त्याचवेळी त्यांनी धरणात मुतण्यापेक्षा थुंकणे चांगले, अशी मखलाशी देखील केली.Savarkar also spat on the traitor!!; Savarkar’s name on Rauta’s falling tongue
पण त्या पलीकडे जाऊन त्रंबकेश्वर मध्ये त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन आपल्या थुंकण्याचे समर्थन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील भर कोर्टात गद्दारावर थुंकले होते. मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, असा दावा संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांशी बोलताना केला.
संजय शिरसाट यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत जेव्हा थुंकले, त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाचा सल्ला दिला होता. मात्र त्या सल्ल्यावर संजय राऊत यांनी धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असे सांगून अजित दादांना टोला हाणला. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरला निघून गेले.
त्रंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर परत एकदा पत्रकारांनी राऊत यांना थुंकण्यासंदर्भातलाच प्रश्न विचारला त्यावेळी तर त्यांनी सावरकरांचे नाव घेतले आणि सावरकर गद्दाराकडे बघून भर कोर्टात कसे थुंकले होते, याचे वर्णन केले. आपण हे सगळे त्यांच्याकडून शिकलो. कारण गद्दारावर थुंकुणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Savarkar also spat on the traitor!!; Savarkar’s name on Rauts falling tongue
महत्वाच्या बातम्या
- सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज
- PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी US संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
- ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, भीषण अपघातात अनेक जखमी
- आळशी आणि नाकर्ते; शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावले