• Download App
    सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर Satyashodka leader Saroj Kamble's son Inayat Pardeshi killed for property

    सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर

    प्रतिनिधी

    धुळे : कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत रणजित परदेशी हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने प्रॉपर्टीसाठी आपल्या आईचीच हत्या केल्याचे उघड झाले आहे. Satyashodka leader Saroj Kamble’s son Inayat Pardeshi killed for property

    धुळे शहरातील आझाद नगर पोलिसांनी तब्बल 12 दिवसांनंतर इनायत परदेशीविरूद्ध फौजदारी कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्यशोधकी, परिवर्तनवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. बऱ्याच दिवसांच्या शोधानंतर इनायत परदेशी पोलिसांसमोर हजर झाला. आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

    वयोवृद्ध आई सरोज कांबळे पुनर्विवाह करणार असल्यामुळे प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही, म्हणून आईस मारहाण करीत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इनायत परदेशीविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात शहरातील नटराज चित्रमंदिरासमोर काझी प्लॉट भागातील सरोजनी ऊर्फ सरोज रणजित परदेशी- कांबळे (वय ६६) यांचा ५ जूनला सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला होता पण पोलिसांनी त्यावेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

    यासंदर्भात सरोज कांबळे यांची बहीण निवृत्त शिक्षिका सुधा सुकदेव काटकर (वय ८१ रा. कल्याण) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बहीण सरोज कांबळे परदेशी या पती रणजित परदेशी व मुलगा इनायत रणजित परदेशी (वय ३६) सोबत राहात होत्या. सरोजनी या पंजाब नॅशनल बँकेत तर रणजित परदेशी हे येवला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दोघेही पाच वर्षांपासून निवृत्त झाले होते. नंतर ते सत्यशोधक मार्क्सवादी संघटनेचे काम करीत होते.

    रणजित परदेशी यांना आजार असल्याने ते बिछान्यावर पडून आहेत. इनायत हा घरीच आई- वडिलांची कथित देखरेख करीत होता. सरोजनी परदेशी या पुनर्विवाह करणार म्हणून इनायत हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. आईने दुसरा विवाह केल्यास सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार नाही. या कारणावरून सरोजनी या वयोवृद्ध असून त्यांना मारहाण केल्यास त्यांना मृत्यू येऊ शकतो, असे माहिती असताना इनायतने वेळोवेळी आई सरोजनी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    पोलिसांनी इनायत विरुद्ध सुरुवातीलाच कारवाई करायला टाळाटाळ केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे. पण आता इनायत बऱ्याच शोधा नंतर पोलिसांसमोर हजर झाला पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

    इनायतला मानसिक रुग्ण ठरवण्याची चढाओढ

    इनायत परदेशी डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता आहे पण तो प्रत्यक्ष आपल्या आईच्या खुनात अडकल्याचे पाहून डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते त्याच्या “बौद्धिक बचावा”साठी पुढे आले आहेत. इनायत परदेशी हा मानसिक दृष्ट्या रुग्ण होता. तो दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा असल्याने त्याने आपली विवेक बुद्धी गमावली, अशा आशयाचे समर्थन करणारे लेख डाव्या विचारवंतांनी सोशल मीडियावर लिहिले आहेत.

    Satyashodka leader Saroj Kamble’s son Inayat Pardeshi killed for property

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!