• Download App
    Satyajit tambe issue created lot of fire in Congress and MVA

    सत्यजित तांबेंची अपक्ष उमेदवारी ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीत आधी ठिणगी, विजयानंतर वणवा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सत्यजित तांबे यांची काँग्रेसकडून उमेदवारी मागून नंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे ही काँग्रेस अंतर्गत आणि महाविकास आघाडीत आधी ठिणगी होती. पण विजयानंतर त्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले आहे. Satyajit tambe issue created lot of fire in Congress and MVA

    सत्यजित तांबे यांनी विजयानंतर एक दिवस थांबून आज 4 फेब्रुवारी रोजी “ठरल्या”नुसार त्यांची भूमिका जाहीर केली. त्याच्या आधीच विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांना डिवचून घेतलेच होते. त्याचा पुढचा अंक सत्यजित तांबे यांनी आजच्या स्वतःच्या पत्रकार परिषदेत सादर केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असताना महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचे नेते वेगळेच षडयंत्र रचत होते, असा थेट आरोप त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता केला आपल्याकडे भरपूर मसाला असल्याचा इशारा त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला. आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे भाऊ, असे संबोधून काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात केले.

    अजितदादांनी लोकमतच्या मुलाखतीमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलल्याचा खुलासा केला होता. पण जेव्हा स्वतः सत्यजित तांबेंनी शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे सत्यजित तांबे यांनीच पत्रकार परिषदेत सांगितले. यातून महाविकास आघाडीत आणि काँग्रेस अंतर्गत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी विषयी नेमक्या कोणत्या “भावना” होत्या, हे स्पष्ट दिसून येते.

    एबी फॉर्म चुकीचा देणे हे काँग्रेसच्या राजकारणात अजिबात नवीन नाही. विधान परिषदेचा पदवीधर मतदार संघाची ही तर फार छोटी निवडणूक आहे. काँग्रेसने आतापर्यंत बड्या बड्या नेत्यांना एबी फॉर्म चुकीचा देण्यातून राजकीय दृष्ट्या गंडवले आहे. तिथे सत्यजित तांबे अजून तरी त्या तुलनेत लहान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी सांगितलेले पत्रकार परिषदेत सांगितलेले सत्यच आहे.


    सत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा??


    सत्यजित तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांनी देखील आपल्याकडे भरपूर मालमसाला असल्याचे सांगून फक्त तांबे यांच्यावरच नव्हे, तर थेट अजितदादांवरही हल्लाबोल केला आहे. सत्यजित तांबेंच्या घरातला वाद अजितदादांनी चव्हाट्यावर आणला. इतकेच नाही तर ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातही बरेच बोलले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकमेकांच्या नेत्यांविषयी जपून बोलण्याच्या तत्वालाच हरताळ फासला गेला आहे.

    सत्यजित तांबे यांच्या आधी काँग्रेस नंतर अपक्ष उमेदवारीवरून पडलेली ठिणगी अशी राजकीय वणव्यात रुपांतरीत झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते अगदी अजितदादा, नाना पटोले किंवा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे एकमेकांच्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांविषयी जपून बोलण्याचा जाहीर सल्ला जरूर देतात. पण हेच ते नेते आहेत, जे इतरांना दिलेला सल्ला आपल्याला लागू नाही असे समजून बिनधास्त समोरच्या पक्षाच्या नेत्यांविषयी उघडपणे बोलत असतात. सत्यजित तांबे यांच्या अपक्ष विजयानंतर निर्माण झालेल्या राजकीय वणव्याचे हे असे चित्र आज 4 फेब्रुवारी 2023 ला दिसले आहे.

    आता हा वणवा काँग्रेस अंतर्गत आणि महाविकास आघाडी अंतर्गत कसा पसरतो आणि त्यातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी राजकीय दृष्ट्या आघाडीतले नेते राजकीय दृष्ट्या एकमेकांना कसे पोळून काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    Satyajit tambe issue created lot of fire in Congress and MVA

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!