• Download App
    Satish Shuklaपुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; अविश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!!

    Satish Shukla : पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; अविश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गंगा गोदावरी पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; विश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!! असला प्रकार नाशिक मध्ये घडला. Satish Shukla

    नाशिक ते रामकुंडावर असलेल्या वस्त्रांतर गृह येथे असलेल्या गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या कार्यालयात संघाच्या सदस्यांनी विशेष सभा घेतली. शांतारामशास्त्री भानोसे अध्यक्षस्थानी होते. त्या सभेत तब्बल 150 सदस्यांनी एकत्र येऊन अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला. त्यांना अध्यक्षपदावरून हटविले. पण पुरोहित संघाच्या सदस्यांनी बोलावलेली सभाच बेकायला होती. त्यामुळे आपणच अजून अध्यक्ष पदावर कायम असल्याचा दावा सतीश शुक्ल यांनी केला.

    – शांतारामशास्त्री भानोसे यांचा सल्ला

    त्यावर पुरोहित संघाच्या विशेष सभेचे अध्यक्ष शांतारामशास्त्री भानोसे महत्त्वाचा खुलासा केला. सतीश शुक्ल यांना संबंधित सभेला निमंत्रण दिले होते, पण ते आले नाहीत. या सभेत पुरोहित संघाच्या बहुसंख्य सदस्यांनी अविश्वास ठराव आणून सतीश शुक्ल यांना अध्यक्षपदावरून बाजूला केले आहे. चंद्रशेखर पंचाक्षरी यांची अध्यक्षपदावर निवड केली आहे, पण सतीश शुक्ल हे पुरोहित संघाचे ज्येष्ठ सभासद आहेत. त्यामुळे त्यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वतःहून पायउतार व्हावे. त्यांनी पुरोहित संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे. अनावश्यक वाद वाढवून आणखी तेढ निर्माण करू नये, असे शांतारामशास्त्री भानोसे म्हणाले.



    – नूतन कार्यकारिणीकडून कुंभमेळ्याचे नियोजन

    सतीश शुक्ल हे 35 वर्षे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कारभार केला. कुंभमेळ्याच्या नियोजना संदर्भात देखील ते परस्पर शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करत राहिले. या चर्चेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. कुंभमेळ्याची नियोजन करताना सर्वांना विश्वासात घेऊन नवी कार्यकारणी व्यापक काम करेल, असे नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी स्पष्ट केले.

    मात्र, सतीश शुक्ल यांनी या विशेष सभेवरच आक्षेप घेतला. सभा बोलवण्यापूर्वी सदस्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांनी बोलावलेली सभाच बेकायदा होती. तिला पुरोहित संघाच्या घटनेचा आधार नव्हता. त्यामुळे न्यायालयात आणि धर्मादाय आयुक्तांपुढे त्या सभेचा टिकाव लागणार नाही. गंगा गोदावरी पुरोहित संघाचा मीच अध्यक्ष आहे, असा दावा सतीश शुक्ल यांनी केला.

    Satish Shukla adamant over his presidency of Ganga Godavari Purohit sangh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    क्रीडा क्षेत्रातल्या पवार कुटुंबाच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग; काकांच्या पाठोपाठ पुतण्याच्या वर्चस्वावरही प्रहार; ऑलिंपिक संघटना निवडणुकीत अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत!!

    नाशिक मध्ये जैन माता, भगिनींच्या वतीने दिव्य गोदावरी महाआरती; भक्तिदीपाची उजळली अखंड ज्योती!!

    Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार