विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Satej Patil कोल्हापूर खासदार शाहू महाराजांच्या सुनबाई आणि काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातील अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली. कोल्हापूरमध्ये आलेल्या या पॉलिटिकल ट्विस्टमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश पाटील भयंकर संतापले. दम नव्हता, तर उभारायचं नव्हता ना… मग मी माझा दम दाखवला असता, अशा शब्दांमध्ये त्यांनी खासदार शाहू महाराजां समोरच वाभाडे काढले. कोल्हापुरात काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद उसळल्याचे यामुळे उघड्यावर आले. Retreat of the Madhurima kings; Satej Patil is angry!
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आज मोठ्या घडामोडी घडल्या काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिलेल्या मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. ज्या शाहू महाराजांना काँग्रेसने खासदार केले, त्यांच्या सुनबाईंनी पक्षाला तोंडघशी पाडले, अशा भावना कोल्हापूरमध्ये व्यक्त झाल्या. याविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश पाटील प्रचंड भडकले आणि झक मारायला मला तोंडावर पाडले. तुमच्या दम नव्हता, तर उभ राहायचं नव्हतं ना. मग मी माझा दम दाखवला असता, अशा शब्दांमध्ये त्यांनी खासदार शाहू महाराज यांच्या समोरच संताप व्यक्त केला. Satej Patil
काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे अपरिहार्य कारणामुळे मधुरिमा राजे यांना माघार घ्यावी लागली. पण ही फक्त माघार नाही, तर पुढच्या लढाईची तयारी आहे एवढीच प्रतिक्रिया खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली.
तर माझी मनःस्थिती सध्या ठीक नाही, पण मी प्रसार माध्यमांमधून मतदारांशी आणि जनतेशी नंतर बोलेन, असे मधुरिमा राजे यांचे पती आणि माजी आमदार मालोजी राजे यांनी सांगितले. कोल्हापुरातल्या या घटनेमुळे महाराष्ट्रभर काँग्रेसमधल्या अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली.
Retreat of the Madhurima kings; Satej Patil is angry!
महत्वाच्या बातम्या
- RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका
- Uddhav Thackeray group उध्दव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे का? मनसेचा घणाघात
- Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी हल्ला; यूपीतील 2 तरुणांवर गोळीबार; 12 दिवसांपूर्वी 7 जणांची हत्या
- Pakistan : पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात 7 ठार, 23 जखमी; मृतांमध्ये 5 मुले आणि पोलिसांचा समावेश