विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर काल माजी मंत्री सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराजांसमोर प्रचंड संताप व्यक्त केला. दम नव्हता, तर लढायचंच नव्हतं ना. मला तोंडघाशी पाडलेत, अशा शब्दांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमधल्या मतभेदांना संतापाची वाट मिळाली. सतेज पाटलांचा आपल्या समर्थकांकडून विश्वासघात झाल्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्र समोर उघड झाला. परंतु, आज सतेज पाटलांनी त्या सगळ्या विषयावर पडदा टाकला. Satej Patil anger yesterday after the withdrawal of Congress
कोल्हापूरचा एपिसोड संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये रेटारेटी करून ट्रिपल डिजिट जागा लढवण्यासाठी मिळवल्या. परंतु कोल्हापूरमध्ये मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यामुळे त्या ट्रिपल डिजिट जागेलाच धक्का लागला. शिवाय महायुतीशी कोल्हापूरमध्ये एकाकी टक्कर घेणाऱ्या सतेज पाटलांना विश्वासघाताचा धक्का बसला. त्यातून त्यांचा संताप उसळला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार धनंजय महाडिक या भाजपच्या नेत्यांनी त्यांना डिवचले. संजय राऊत यांनी त्यांना चिमटा काढला.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयावर घेतली आणि कोल्हापूर मधल्या एपिसोड वर पडदा टाकण्याचा निर्णय जाहीर केला. महाविकास आघाडीची पुढची भूमिका संध्याकाळपर्यंत निश्चित करून कोल्हापूर उत्तरची जागा निवडून आणू, असे सांगून सतेज पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघून गेले.
Satej Patil anger yesterday after the withdrawal of Congress
महत्वाच्या बातम्या
- Rajeev Chandrasekhar राहुल गांधींनी वायनाडच्या जनतेचा केला विश्वासघात – राजीव चंद्रशेखर
- Jan Dhan account अशाप्रकारे जन धन खात्यातून 10,000 रुपये मिळू शकतात!
- Jay Shah : ‘BCCI’ला लवकरच नवीन सचिव मिळणार ; जय शाह यांच्या जागी ‘हे’ नाव आघाडीवर
- Election उत्तर प्रदेश, केरळ अन् पंजाबमधील निवडणुकीची तारीख बदलली!