प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस लागलेली असताना भाजप आणि महाविकास आघाडी यांचे नेते एकमेकांना टक्केटोणपे लगावतत आहेत. पण त्याचवेळी आपापले आमदार आपापल्या गोटात कायम ठेवून दुसऱ्या गोटातले आमदार आपल्या गोटात ओढण्यासाठी आतून आणि बाहेरून जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. Satej Patil advises BJP to take over MLA
काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना आपले स्वतःचे आमदार संभाळण्याचा उपदेश केला आहे. भाजपमध्येच आधीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार सध्या आहेत. त्यांना “जपून” ठेवा असा टोमणा सतेज पाटील यांनी भाजप नेतृत्वाला मारला आहे.
मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडे कागदावर बहुमत असूनही सहाव्या जागेच्या निवडणुकीसाठी धास्तावलेल्या आघाडीने आपले सर्व आमदार निवडणुकीपूर्वी दोन दिवस आधी मुंबईत बोलवून त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून देण्याची तयारी चालवली आहे.
दोन्ही बाजूंनी घोडेबाजार टाळण्याच्या जोरदार घोषणा केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात एकमेकांचे आमदार खेचाखेचीची जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची नौबत आली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या आमदारांची दोन दिवस चांगली सरबराई केली जाणार आहे.
मात्र या बातमीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या 170 पेक्षा जास्त आमदारांचे दोन दिवसांचे पंचतारांकित हॉटेलचे खाण्यापिण्याचे आणि राहण्याचे लाखोंमध्ये जाणारे बिल नेमके कोण भरणार?? या बिलाचा खर्च कोण करणार??, याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
Satej Patil advises BJP to take over MLA
महत्वाच्या बातम्या
- आयसीसीआर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा जगभरात वाजणार डंका!!
- राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मते भाजपला?? ठरणार का गेम चेंजर??
- कानपूर हिंसाचार : सीएम योगींनी रात्री उशिरा बोलावली बैठक, म्हणाले- कंटकांवर लागणार गँगस्टर, मालमत्तेवर चालवणार बुलडोझर
- सुप्रिया सुळे : तुळजापुरातलं नवसाचं मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच ताटातलं वाटीत आलं!!