Saturday, 10 May 2025
  • Download App
    ससूनचे डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढला ; - किडनी मान्यता समितीचे प्रकरण भोवले। Sasoon hospital superintendent Dr Ajay Taware charge shifted to another member because Kidney racket nigiligance

    ससूनचे डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढला ; – किडनी मान्यता समितीचे प्रकरण भोवले

    पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करी प्रकरण ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना अखेर भोवले आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाचा अधीक्षक पदाचाही पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे. Sasoon hospital superintendent Dr Ajay Taware charge shifted to another member because Kidney racket nigiligance


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करी प्रकरण ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना अखेर भोवले आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाचा अधीक्षक पदाचाही पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे. तसेच, विभागीय प्रत्यारोपण समितीचे अधिकारही चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून घेण्यात आले आहेत.

    डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक व विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करी प्रकरणी आरोग्य विभागाने सुरवातीला रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केला. त्यापाठोपाठ वैद्यकिय शिक्षण विभागाने (डीएमईआर) ही चौकशी समिती नियुक्त करत ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. सध्या अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे. तर डॉ. तावरे हे त्यांच्या मुळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असतील.



    डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांनी अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. तावरे यांनी गुरूवारी सकाळीच पदभार सोडला. तसेच, नवीन अधीक्षक नियुक्त करण्याचे अधिकारही डीएमईआर ने स्वतः कडे राखीव ठेवले आहेत. ससूनच्या अधिष्ठाता यांना नवीन अधीक्षक पदासाठी पात्र असलेल्यांची नावे पाठवा असे सांगण्यात आले असून विभागाकडूनच नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.

    कोल्हापुरच्या महिलेला 15 लाख रूपयांचे अमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यावर आरोग्य विभागात त्याचे प्रचंड पडसाद उमटले आहेत. डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने संबंधित महिलेने व एजंटांनी बनवून दिलेले खोटी कागदपत्रे योग्य प्रकारे पडताळणी केली नाही. म्हणून, पुढे हा सर्व प्रकार घडला.

    ससूनमध्ये चर्चेला उधान

    याआधी कित्येक वेळा तक्रारी होउनदेखील डॉ. तावरे हे सलग सात ते आठ वर्षे अधीक्षक पद त्यांच्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरले होते. मात्र किडनी प्रकरण त्यांना चांगलेच भोवले आहे. कार्यभार काढल्यानंतर ससून रुग्णालयात गुरूवारी दिवसभर याबाबतच दबक्या आवाजात चर्चा सूरू होती. मात्र, या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    वैद्यकिय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. पदभार काढण्याचे कारण मात्र माहित नसून सध्या या पदाचा कार्यभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे.

    • डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

    Sasoon hospital superintendent Dr Ajay Taware charge shifted to another member because Kidney racket nigiligance

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा