प्रतिनिधी
बीड : Sarpanch Deshmukh murder case सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्यास्कॉर्पिओत एकूण १९ पुरावे सीआयडीलाआढळले आहेत. कारचा फॉरेन्सिकतपासणी अहवाल आला असून डाव्यादरवाजाच्या काचेवरील दोन ठसे आरोपीसुधीर सांगळेचे असल्याचे समोर आलेअाहे. या गुन्ह्यातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर कबुली जबाबदिला होता. त्यांच्या कबुलीजबाबाची प्रत आरोपीच्या वकिलांना दिली आहे.Sarpanch Deshmukh murder case
या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्याएमएच ४४ झेड ९३३३ या क्रमांकाच्याकाळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. डाव्या बाजूच्या काचेवर दोन ठसे आढळले. ते आरोपीसुधीर सांगळे याचे असल्याचे समोर आले.
आंधळेला अटक करा, सर्वआरोपींना फाशी द्या- देशमुख
चार महिन्यांनंतर संतोष देशमुख यांच्याहत्येची आरोपींनी कबुली दिली आहे.आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करातसेच सर्व आरोपींना फाशीची शिक्षाद्यावी, अशी मागणी धनंजय देशमुखयांनी केली आहे.
मॅजिस्ट्रेटसमोर कबुलीमुळेकेस संपल्यात जमा- दमानिया
सुदर्शन घुलेने देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांपुढे कबुली दिली असेलतर ग्राह्य धरली जात नाही. मॅजिस्ट्रेटपुढेदिली तर केस संपल्यात जमा आहे.कलम १६४ नुसार जर कबुली दिलीअसेल तर चांगलेच आहे, अशीप्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजलीदमानिया यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्याकी, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळ,राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलिसअधिकारीदेखील आरोपींच्या संपर्कातहोते. या सर्वांना सहआरोपी करावे. तेधनंजय मुंडे यांना छुपी मदत करत होते.हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराड होताअसे चार्जशीटमध्ये येत नाही तो पर्यंतत्यांना फाशीची शिक्षा होणार नाही, असेदमानिया यांनी सांगितले.
देशमुखांना २ तास मारहाण
घटनेच्या दिवशी ९ डिसेंबरला ३ वाजून४६ मिनिटांनी आरोपींनी मारहाणकरायला सुरुवात केली होती, तरशेवटचा व्हिडिओ हा ५ वाजून ५३मिनिटांचा आहे. त्यानंतर काही वेळानेदेशमुख यांचा मृत्यू झाला. आरोपींनीदेशमुखांना २ तास ७ मिनिटे म्हणजे १२७मिनिटे मारहाण केल्याचे स्पष्ट होते.
मॅजिस्ट्रेटसमोर कबूलनामा
आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणिसुदर्शन घुले यांना पुण्यात अटक केलीहोती. सीआयडीने सेक्शन १८ प्रमाणेतिघांना पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर हजरकरून कबुलीजबाब घेतले होते. हे जबाबबंद पाकिटातून विशेष सरकारी वकिलांनापाठवण्यात आले होते. त्यांची प्रतआरोपींच्या वकिलांना दिली आहे.
19 pieces of evidence found in the Scorpio car of the accused in the Sarpanch Deshmukh murder case;
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule ‘’हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी…’’
- Bangladeshis : मुंबईत १७ बांगलादेशींना अटक; चेन्नईमध्ये जाफरच्या एन्काउंटरनंतर ठाणे पोलिस सतर्क
- MP Naresh Mhaske : ‘’ विरोधकांच्या ‘इंडि’ आघाडीचे नाव ‘औरंगजेब फॅन क्लब’ असायला हवे’’
- Foreigners act : भारत म्हणजे धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन बसावं; रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना अमित शाहांनी ठणकावले!!