• Download App
    संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चंदन, वड, पिंपळ देणार शितल छाया|Sant Tukaram Maharaj will give sandalwood, wad, pimpal shade on the palanquin path

    संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चंदन, वड, पिंपळ देणार शितल छाया

    प्रतिनिधी

    पुणे :महाराष्ट्रातील देहू आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर होते.Sant Tukaram Maharaj will give sandalwood, wad, pimpal shade on the palanquin path

    याबाबत नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किलोमीटर लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.



    या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.

    पालखी मार्गावर वृक्षांची लागवड 

    पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० आणि दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, असेही केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.

    Sant Tukaram Maharaj will give sandalwood, wad, pimpal shade on the palanquin path

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!