• Download App
    संकटमोचक : गडकरींची तत्परता! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्ससमधून 'संजीवनी' रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर। Sankatmochak : Gadkari's readiness! First stock of 'Sanjeevani' Remdesivir out of Wardha's genetic life sciences

    संकटमोचक : गडकरींची तत्परता! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्ससमधून ‘संजीवनी’ रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

    महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते .


    नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताना महाराष्ट्रात थेट संजीवनी रेमेडेसिव्हरचे उत्पादनच संकटमोचक नितीन गडकरींमुळे सुरू झाले . केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर या कंपनीतून इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे.
    Sankatmochak : Gadkari’s readiness! First stock of ‘Sanjeevani’ Remdesivir out of Wardha’s genetic life sciences

    वर्ध्यातील सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्स या कंपनीने हे औषध निर्माण करून त्याचा पुरवठा करणे सुरू केले. 17 हजार इंजेक्शनची पाहिली खेप गुरुवारी बाजारात रवाना झाली.

    नितीन गडकरी यांनी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. एकूण `17 हजार इंजेक्शन वापरास सज्ज झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत 5 मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.



    दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार इंजेक्शन्स बनवण्याचं लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

    कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

    पहिल्या खेपेतील 17 हजार इंजेक्शनपैकी 9 हजार 600 इंजेक्शन शासकीय विक्रेत्याच्या माध्यमातून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली. आतापर्यंत एक लाख इंजेक्शनचे उत्पादन झाले आहे. इंजेक्शनचा हा साठा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नागपूर व राज्यात वितरित करण्यात येणार आहे.

    Sankatmochak : Gadkari’s readiness! First stock of ‘Sanjeevani’ Remdesivir out of Wardha’s genetic life sciences

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा