प्रतिनिधी
मुंबई : गोरेगाव येथील 1034 कोटी रूपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने अटक केलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी त्यांची मागील सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. Sanjay Raut’s remand has been extended till September 19
पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.
Sanjay Raut’s remand has been extended till September 19
महत्वाच्या बातम्या
- शिक्षक दिनानिमित्त युजीसीची सावित्रीबाईंच्या नावाने फेलोशिप; अन्य 4 फेलोशिपही जाहीर!!
- टाटा सोडल्यानंतर सायरस मिस्त्री काय करत होते? : शापूरजी पालोनजींचा असा आहे व्यवसाय विस्तार
- मर्सिडीझच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह : 68 लाखांची कार, 7 एअरबॅग, 1950 सीसी इंजिन… सेफ्टी फीचर्स असूनही सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू
- सायरस मिस्त्रींचा रतन टाटांशी का झाला होता वाद?