विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा डोके फिरल्यासारखे विधान केले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करायला लागला आहे. हा प्रश्न आम्ही जागतिक पातळीवर नेऊ आणि मोदींच्या देशात लोकशाहीची कशी हत्या होते जगाला सांगू असे ते म्हणाले.Sanjay Raut
स्वतंत्र भारतात आजपर्यंत निवडणुकांच्या राजकारणात देशाची अप्रतिष्ठा होईल असे कधी घडले नव्हते. पण जागतिक पातळीवर भारताची बदनामी करण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे. राऊत म्हणाले, किमान 150 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष प्रत्येक विधानसभा मतदान यादीमध्ये जे पक्के मतदार आहेत, ज्याने साधारण महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान केलं ते 10000 नाव प्रत्येक मतदारसंघातून काढायची आणि त्या बदल्यात दहा हजार बोगस नावं टाकायची .
खोटे आधार कार्ड खोटे ओळखपत्र या माध्यमातून 10000 फक्त भारतीय जनता पक्ष निवडणुका लढणार आहे असे दीडशे मतदारसंघ शोधले आहेत. त्याच्यामध्ये शिंदेगट आणि अजित पवार जिथे लढणार आहेत त्यांचा समावेश नाही. हा घोटाळा लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा होत आहे. हरण्याच्या भीतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं या देशातल्या लोकशाहीची हत्या झाली निवडणूक आयोग हा गृह मंत्रालयाच्या आखेतारीत येतो म्हणजे अमित शहा ह्या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. हरियाणा आणि झारखंडला तेच केलं. आता महाराष्ट्रात सुद्धा तेच करायला जात आहे. आम्ही जागतिक स्तरावर हा प्रश्न उचलू लोकशाहीची हत्या ही मोदींच्या देशात कशी चालली , हे सांगू.
राऊत म्हणाले , महाराष्ट्रातल्या बीजेपीचे चार प्रमुख नेते या सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्याला आता राज्यपाल नियुक्त आमदार केलं आहे. तो या सगळ्याचा सूत्रधार, आम्ही मतदारांना जागृत करून प्रसंगी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला चाल करून जाऊ. तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्ही मर्द असाल तर लोकशाही मार्गाने आमच्यासमोर उतरा आणि जिंकून दाखवा
शिवसेनापक्षप्रमुख यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ चर्चा करू. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू आम्हाला असं वाटतं महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जवाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात संविधान बचाव चा मुव्हमेंट आहे ते यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकटीचा पराभव सहज करू शकतो. आणि आम्ही नक्कीच महाराष्ट्रात त्या दृष्टीने पावलं पडत आहेत. कोणी काही म्हणू द्या या राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे नक्की
काल बैठक सुरू असताना आणखी एका विषयाला महत्त्वाचा हात घातला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता याव्या, भारतीय जनता पक्ष पराभवाच्या खाईत आहे, भारतीय जनता पक्ष डूबत आहे,
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनता गेली मतदार गेली आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करायला लागली बैठक सोडून मी नाना पटोले, जयंत पाटील जे आलो घाईघाईने त्यासाठीच आलो भारतीय जनता पक्ष ज्या मतदारसंघात लढणार आहे ते साधारण 150 मतदारसंघ आहेत. शिंदे किंवा अजित पवार नाही, त्यांना बाजूला ठेवला आहे . बावनकुळे हे या घोटाळ्याचे एक प्रमुख सूत्रधार हा घोटाळा कसा करावा आणि कसा केला जावा यासाठी त्यांनी नागपूरला एक शिबिर घेतले. विशेष शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, मतदार यादीतून दहा हजार नाव कसे ओढायची आणि आपली नाव कशी घालायची यासाठी प्रशिक्षण शिबीर झाले, असेही ते म्हणाले.
26 तारखेला जर सरकार बनवू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट पुढे सहा महिने लावा असे फार मोठे कारस्थान अमित शहा यांचे आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचा सरकार बनू द्यायचे नाही. राज्य महाराष्ट्रातल्या शत्रूंच्या हातात राहावं सुरत, अहमदाबाद आणि गुवाहटी ला हे जी कांड केली तरी त्यांच्या हातात राज्य राहो यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची म्हणून फक्त दोन दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घाणेरडा प्रकार झाला नाही तो अमित शाह करत आहे कारण ते महाराष्ट्रातल्या एक नंबरचे शत्रू आहेत. बाकी एकनाथ शिंदे, फडणवीस ,अजित पवार हे त्या महाराष्ट्रातल्या दुष्मनांचे हस्तक आहेत. मांडलिक आहेत
“Sanjay Raut Threatens to Tarnish Nation’s Image, Warns of Taking Election Scam Allegations to Global Level”
महत्वाच्या बातम्या
- Sudhanshu Trivedi : सुधांशू त्रिवेदींचा विरोधकांवर ‘व्होट जिहाद’चा आरोप!
- NDA Chief Minister and : ‘NDA’च्या मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!
- Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाणार?
- Prashant Kishor प्रशांत किशोर यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री