• Download App
    "सिंचनदादा" उल्लेखावर सुनील तटकरे भडकले; उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!! Sanjay raut targets ajit pawar over his 70000 cr. Irrigation scam, sunil tatkare targets uddhav thackeray over his BJP connection

    “सिंचनदादा” उल्लेखावर सुनील तटकरे भडकले; उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!!

    प्रतिनिधी

    मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख “सिंचनदादा” या शब्दाने केला. त्यावर अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे भडकले आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!! Sanjay raut targets ajit pawar over his 70000 cr. Irrigation scam, sunil tatkare targets uddhav thackeray over his BJP connection

    संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांचा उल्लेख “सिंचनदादा” असा करून अजित पवार आणि भाजप या दोघांवरही शरसंधान साधले होते. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री असताना तब्बल 70000 कोटींचा सिंचन घोटाळा झाला होता त्या संदर्भात त्यांच्यावर आरोप होता त्यामुळेच संजय राऊत यांनी अजितदादांचा उल्लेख “सिंचनदादा” असा केला.

    पण संजय राऊत यांनी हे जुने प्रकरण काढल्यामुळे सुनील तटकरे भडकले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वतः उद्धव ठाकरेच कसे भाजपला जाऊन मिळणार होते, याची कहाणी सांगितली.

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते, पण त्यावेळी अजित पवार यांच्याबरोबर गेले नव्हते म्हणून उद्धव ठाकरे रागवले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी एकट्यानेच चर्चा केली. त्याचवेळी त्यांच्या मनात चलबिचल निर्माण झाली होती आणि ते भाजपबरोबर जाण्याच्या मनःस्थितीत आले होते. मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनी ते संजय राऊत यांना बोलून दाखवले आणि संजय राऊत यांनी ते आम्हाला सांगितले होते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

    मराठा आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या काळात तापला असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांसमवेत एकट्यानेच चर्चा केली होती. नंतर अशोक चव्हाण यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांनी नव्या महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली होती, पण त्यावेळी भाजपशी संधान साधल्याचे उत्तर त्यांनी दिले नव्हते.

    पण संजय राऊत यांनी अजित पवारांचा उल्लेख “सिंचनदादा” असा केल्याबरोबर सुनील तटकरे भडकले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची जुने भाजप कनेक्शन बाहेर काढले.

    Sanjay raut targets ajit pawar over his 70000 cr. Irrigation scam, sunil tatkare targets uddhav thackeray over his BJP connection

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!