प्रतिनिधी
नागपूर : टोले हाणायला गेले शिंदेंना, पण निघाली ठाकरेंची अशी अवस्था संजय राऊत यांच्या भाषणाची झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे कोण आहेत? अशी विचारणा केली, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut targeted Eknath Shinde, but mimicriked Uddhav Thackeray
राऊतांनी हा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानावर राऊतांनी हे उपहासात्मक वक्तव्य केले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यावर राऊतांनी शिंदेंना टोला हाणला. पण राऊतांचे हे भाषण व्हायरल झाले, ते मात्र हा ठाकरेंची शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही, अशा कमेंटसह!!… त्यामुळे टोले हाणायला गेले शिंदेंना आणि निघाली ठाकरेंची, अशी अवस्था राऊतांच्या भाषणाची झाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राऊत म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा झाली. उद्धव ठाकरे कोण आहेत? या माणसाची कमाल आहे. इतकी संकटे आली तरी ते हार मानत नाहीत, असे ते म्हणत होते. उद्या युद्धाची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. जो बायडन, पुतीन यांना उद्धव ठाकरे कोण आहेत, असे विचारत होते. ते म्हणत होते मोदींना विचारा, त्यांनी अजून आपली भेट का करून दिली नाही? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील उद्धव ठाकरे कोण आहेत? असे विचारत होते, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Sanjay Raut targeted Eknath Shinde, but mimicriked Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- पवार काँग्रेस भवनात, अब्दुल्ला, मुफ्ती भारत जोडो यात्रेत; केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व मान्यतेच्या दिशेने
- केंद्रात मोदी विरोधी आघाडी उघडण्याचा मनसूबा राखणारे केसीआर म्हणाले, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड!; नेमका अर्थ काय?
- मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त कायद्याच्या जाळ्यात; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर; महाविकास आघाडी गैरहजर
- शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून अजितदादांची भरारी; शरद पवार ते अनिल देशमुख भेटीच्या अटकळी