विशेष प्रतिनिधी
मुंबई: ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी हा भाजपच्या कार्यालयामध्ये काम करत आहे, अशी टीका त्यांनी केले.Sanjay Raut says ED’s notice is a love letter, BJP’s man is a desk officer in ED
शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे असे नोटीशीत म्हटले आहे. त्याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘ईडीकडून मिळालेली नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांनंतर आता अशा प्रेमपत्रांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.
अनिल परब यांना भाजपच्या नेत्यांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करणार आहेत. राऊत म्हणाले की, ‘एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी हा भाजपच्या कार्यालयामध्ये काम करत आहे’
Sanjay Raut says ED’s notice is a love letter, BJP’s man is a desk officer in ED
महत्त्वाच्या बातम्या
- मारुती सुझुकीच्या कार सप्टेंबरपासून महागणार, वर्षातील सलग तिसरी वाढ; अनेक पार्टच्या किमती वाढल्याने घेतला निर्णय
- हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा
- 72 कोटींच्या घोटाळ्यात वाशीममध्ये शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी ED चे छापेमारी
- WATCH : पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती