Sanjay Raut : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी सद्यस्थितीला ‘युद्धसदृश्य’ असे संबोधले आहे. ते म्हणाले की, सर्वत्र दहशत व तणाव आहे. महाराष्ट्रा हे कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. मागच्या काही दिवसांपासून येथे दररोज साठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. Sanjay Raut says, call a special session of Parliament to discuss the war-like corona situation
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी सद्यस्थितीला ‘युद्धसदृश्य’ असे संबोधले आहे. ते म्हणाले की, सर्वत्र दहशत व तणाव आहे. महाराष्ट्रा हे कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. मागच्या काही दिवसांपासून येथे दररोज साठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.
सद्य:परिस्थितीबद्दल संजय राऊत यांनी ट्विटरवर लिहिले की, ही एक अभूतपूर्व आणि जवळपास युद्धासारखी परिस्थिती आहे. सगळीकडे अस्वस्थता आणि तणाव आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही, लसीकरणही होत नाहीये! हे संपूर्ण गोंधळाचे वातावरण आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. जय हिंद!”
दरम्यान, महाराष्ट्रात संचारबंदी लागू असूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. राज्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची केंद्राकडे मागणी केल्यावर त्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. ऑक्सिजनचा महाराष्ट्राला सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी केंद्राने विशेष तरतूद केली आहे. एवढेच नाही, तर रेमडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांना उत्पादनात वाढ करण्याचेही निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संचारबंदीतूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.
Sanjay Raut says, call a special session of Parliament to discuss the war-like corona situation
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’
- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय
- Important Websites : आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा
- WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग
- बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन!