विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या देशभरात नवीन उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार यावर सतत काही ना काही चर्चा चालू आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. पवार आणि ठाकरे गट हे नक्षल कनेक्शन असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असा सवाल भाजपाने केला होता. त्यावर शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Sanjay Raut
भाजपाने इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर नक्षल कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी त्यांना राधाकृष्णन यांना मत द्याव यासाठी फोन केल्याचा खुलासा केला. मात्र राऊत यांनी पाठींबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं होत. अशातच आता शरद पवार यांनी देखील सी. पी. राधाकृष्णन यांना पाठींबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
विचारधारा वेगळी असल्याने राधाकृष्णन यांना पाठींबा नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून उपराष्ट्रपती पदासाठी भाजपा आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठींबा देण्याची विनंती केली आहे, मात्र ते आमच्या विचारधारेचे नसल्याने आम्ही त्यांना पाठींबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतांनाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं. Sanjay Raut
महाराष्ट्रामधून काँग्रेसकडे लोकसभेत १४ तर राज्यसभेत ३ अशी एकूण १७ खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत २ असे एकूण ११ खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. त्यामुळे मविआतील ३८ पैकी एकही मत फुटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे ही मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
राऊत आणि पवारांची भूमिका ही केवळ संकुचितपणा आणि राजकीय द्वेष
संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर भाजपा कडून मात्र टीका करण्यात येत आहे. ‘संविधाननिष्ट, स्पष्ट वक्ते आणि राष्ट्रभक्तीचा विचार जोपासणारे राधाकृष्णन यांना आमच्या विचारांचे नाहीत म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यां प्रति सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे’ असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत पवार आणि राऊत यांच्यावर टीका केली. तसेच, ‘नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे व अशा विचारसरणीला पाठबळ देणाऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपती पदासाठी योग्य मानणे म्हणजे जनतेशी विश्वासघात असल्याचं’ उपाध्ये यांनी म्हटले आहे. Sanjay Raut
धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची मते फोडली होती, त्याच प्रकारची राजकीय खेळी यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यशस्वीपणे खेळतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Sanjay Raut and Pawar’s role is only narrow-mindedness and political hatred; BJP criticizes
महत्वाच्या बातम्या
- शक्ती संवादातले चिंतन महिला विषयक धोरणात परावर्तित करायची ग्वाही मुख्यमंत्री देतात तेव्हा…
- Malayalam Actress : मल्याळी अभिनेत्रीचा आरोप- काँग्रेस आमदाराने हॉटेलमध्ये बोलावले; आक्षेपार्ह संदेश पाठवले
- Historic changes in GST : जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल: सामान्यांना दिलासा, महागड्या वस्तूंवर अधिक कर
- Goa Speaker Ramesh Tawadkar : गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांचा राजीनामा; मंत्रिमंडळात सामील