प्रतिनिधी
मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांची 11.15 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्या नंतर गुरुवारी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर यावेळी शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. हे स्वागत स्वीकारल्यानंतर संजय राऊत, “मी पवारांचाच माणूस!!”, असे म्हणाले.Sanjay Raut – Pawar: After the warm welcome of Shiv Sainiks, Sanjay Raut said, I am Pawar’s man !!
संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला. मी शरद पवार यांचा माणूस आहे हे लपून राहिलेय का, असे खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मी शरद पवारांचा माणूस
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचा माणूस असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया व्यक्त केली. मी शरद पवार यांचा माणूस आहे हे लपून राहिलेय का?, माझे आणि शरद पवार यांचे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत, त्यामुळेच आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकार आणू शकलो, माझ्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले, यातून आमचे संबंध चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहात
महाराष्ट्रात भाजपविरुद्ध एक चीड निर्माण झाली आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात घोटाळा करून लोकांचे पैसे भाजप नेत्यांनी लाटले आहेत. तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करून, कारवाया करू नका. अशा कारवाया करुन आम्ही तुम्हाला शरण असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहात, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
सोमय्यांचा भ्रष्टाचार
किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सर्वसामांन्यांकडून पैसे उकळले आहेत. हे पैसे राजभवनाकडे सुपूर्द केले जातील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. पण राजभवनापर्यंत ते पैसे पोहोचले नसल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. ते पैसे किरीट सोमय्या मुलुंडला निलम नगर येथे गेले. या पैशांचे पीएमसी बँकेच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut – Pawar: After the warm welcome of Shiv Sainiks, Sanjay Raut said, I am Pawar’s man !!
महत्त्वाच्या बातम्या
- ST Strike : सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन, ग्रॅज्युएटी द्या; मुंबई हायकोर्टाचे निर्देश
- मशिदींवरचे भोंगे : अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही; नागपूर जामा मशिदीच्या चेअरमनचा दावा!!
- Sri Lankan Crisis : श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताची मदत; रणातुंगा – जयसूर्या यांनी मानले भारताचे आभार!!
- मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत माेरेंची पदावरुन हकालपट्टी भाेंगा प्रकरणात पक्षा विराेधात भूमिकेचा ठपका