• Download App
    Sanjay Raut संजय राऊतांची शरद पवारांना राज्यसभेची ऑफर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर पाणी!!

    संजय राऊतांची शरद पवारांना राज्यसभेची ऑफर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर पाणी!!

    नाशिक : संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत शरद पवारांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवायची “ऑफर” दिली. पण या ऑफरमधून राऊतांनी एक प्रकारे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर स्वतःहून पाणी फेरले. कारण शरद पवार त्या ऑफरनुसार राज्यसभेवर निवडून गेले, तर भाजप दोन्ही राष्ट्रवादींना एक होऊ देणार नाही, याचीच राजकीय नेपथ्य रचना संजय राऊत यांनी परस्पर करून ठेवली. Sanjay Raut

    शरद पवारांच्या राज्यसभा सदस्यत्वाची टर्म एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीसह सगळ्या राज्यातले राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाचा किंवा विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणून सुरुवातीलाच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचा “डाव” खेळला. पण भाजपने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तो हाणून पाडला.

    – सहयोग सोसायटी पुढे शरणागती

    त्यानंतर शरद पवारांनी आपली चाल बदलली. त्यांनी थेट सहयोग सोसायटी पुढे शरणागतीच पत्करली. अजित पवारांच्या स्मारकाचे निमित्त करून शरद पवारांनी सहयोग सोसायटीमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांची दोनदा भेट घेतली या भेटींमध्ये सगळे पवार कुटुंब उपस्थित होते. पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन बैठकांमध्ये केवळ अजित पवारांच्या स्मारकांची चर्चा झाली की कुठली राजकीय चर्चा झाली, याचा खुलासा जरी पवार कुटुंबातर्फे रोहित पवारांनी नकारार्थी केला असला, तरी पवारांच्या बरोबर कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी सहयोग सोसायटीमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांची दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबरोबरच राज्यसभेचे समीकरण आणि दोन्ही राष्ट्रवादींचे भवितव्य याविषयी चर्चा केली असल्याचे मानण्यात येते. त्यामध्ये 100 % तथ्य आहे.



    – संधी पार्थला की शरद पवारांना??

    यात मुद्दा फक्त शरद पवारांच्या राज्यसभेची टर्म संपण्याचा नाही, तर त्यापलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिकामी झालेली जागा भरण्याचा आहे. त्या रिकाम्या जागेवर पार्थ पवार याने दावा केलाय. तो दावा मान्य करून पार्थला सुनेत्रा पवारांची उरलेली दोन वर्षांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत द्यायची, की पार्थला संपूर्ण 6 वर्षांच्या राज्यसभा कारकिर्दीसाठी शरद पवारांची रिकामी झालेली जागा द्यायची हा पवार कुटुंबामधला चर्चेचा विषय आहे.

    – राजकीय नाड्या “वर्षा” बंगल्यावर

    या पार्श्वभूमी आज जी संजय राऊत यांनी शरद पवारांना “ऑफर” दिली, की त्यांनी महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवावी. महाविकास आघाडीच्या मतांच्या कोट्यातून राज्यसभेवर जावे. तसे करणे शरद पवारांना शक्य आहे, पण शरद पवारांनी तशी कुठली game केली किंवा “खेळी” केली, तर आमदारांचे मोठे संख्याबळ असून सुद्धा भाजपला महाराष्ट्रातली राज्यसभेची एक जागा गमवावी लागेल आणि ती जागा गमावणे भाजपला परवडणारे नाही आणि भाजप तसे करूही देणार नाही.

    अशा राजकीय परिस्थितीत भाजप आपला हुकूमाचा पत्ता बाहेर काढून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण रोखू शकतो. कारण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे ही पवार कुटुंबाची इच्छा असली आणि त्याला दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मान्यता असली तरी ते विलीनीकरण एकट्या राष्ट्रवादी किंवा पवार नावाच्या “फॅक्टर” वर अवलंबूनच नाही ते भाजप नावाच्या “फॅक्टर” वर अवलंबून आहे. कारण सुनेत्रा पवारांचे नेतृत्व हे “स्वयंभू” नाही. ते एका राजकीय शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर समोर आले. ते भाजपने समोर आणले. त्यामुळे सुनेत्रा पवारांना अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेताना भाजपला विचारात घ्यावे लागेल. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. शरद पवार आणि भाजप यांच्यापैकी एकाची निवड करताना त्यांना भाजपचीच निवड करावी लागेल अन्यथा सत्ता गमवावी लागेल.

    त्यामुळे पवारांनी कितीही “खेळ्या” केल्या, “डाव” टाकले किंवा संजय राऊत यांच्यासारख्यांचे “ऑफर्स” स्वीकारल्या, तरी या सगळ्याला आता खूप मर्यादा आल्यात. राष्ट्रवादीच्या राजकीय नाड्या “गोविंद बाग”, “सिल्वर ओक” आणि सहयोग सोसायटी मधून “वर्षा” बंगल्यावर येऊन पोहोचल्यात.

    Sanjay Raut offer to Sharad Pawar will disintegrate in NCP further

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vijay Pandhare : विजय पांढरे म्हणाले- प्लेन ॲक्सिडेंट अहवाल सरकारधार्जिणा असेल, कोर्टावरचाही विश्वास उडाला

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- विमानात काय घडले 9 तारखेनंतर सांगणार; विलीनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही

    Rupali Chakankar : अंजली दमानियांवर कायदेशीर कारवाई करणार; रूपाली चाकणकरांचा थेट इशारा, म्हणाल्या – त्यांची अतिशय घाणेरडी मानसिकता