• Download App
    Sanjay Raut तुमच्यापेक्षा काँग्रेस - राष्ट्रवादीवाल्यांचेच बाळासाहेबांवर जास्त प्रेम; संजय राऊतांचे परस्पर सर्टिफिकेट!!

    Sanjay Raut तुमच्यापेक्षा काँग्रेस – राष्ट्रवादीवाल्यांचेच बाळासाहेबांवर जास्त प्रेम; संजय राऊतांचे परस्पर सर्टिफिकेट!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महायुतीतल्या भाजप – शिवसेना यांच्यावर शरसंधान साधताना संजय राऊत यांनी तुमच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचेच बाळासाहेबांवर जास्त प्रेम आहे, असे सर्टिफिकेट देऊन टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल काँग्रेसवाल्यांकडून दोन चांगले शब्द बोलून दाखवा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यावर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चकार शब्द काढला नाही, पण संजय राऊत यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीवाल्यांना परस्पर बाळासाहेब प्रेमाचे सर्टिफिकेट देऊन टाकले. Sanjay Raut of Reciprocal Certificate for MVA

    संजय राऊत म्हणाले :

    तुमचं बाळासाहेबांवर प्रेम होतं तर बाळासाहेबांची शिवसेना गैरमार्गाने फोडली, विकत घेतली नसती ना!! अमित शाह यांचं काय तुम्ही मनावर घेता. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुम्ही फोडला ते तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम समजायचं का?? तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी प्रेम आणि आदर आहे. तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाहीये त्यांचं पाठित खंजीर खुपसणारं!!


    Jagannath Chattopadhyay बंगालमध्ये ४२ वर्षांची सत्ता असूनही काँग्रेसचे नाव मिटले गेले – जगन्नाथ चट्टोपाध्याय


    वीर सावरकरांबाबत ही नसती उठाठेव करू नका. आम्ही सातत्याने सांगतो आहोत की सावरकरांना भारतरत्न द्या. का देत नाही आपण?? आम्ही सतत 10 वर्षे आमचा घसा कोरडा करत आहोत, पार्लमेंट असेल , सार्वजनिक व्यासपीठ असेल आम्ही म्हणतोय सावरकरांना भारतरत्न द्या. त्यांच्या क्रांतिकार्याचा गौरव करा. त्यांना भारतरत्न देणं शाहांच्या हातात आहे. 370 कलम हटवण्यात स्वत:ची पाठ थोपटवून घेतात, तर द्या ना सावरकरांना भारतरत्न. कुणी अडवलंय?? बाळासाहेबांसाठी तर कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अमित शाह यांची तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पोस्टर आणि बॅनरवरचा बाळासाहेबांचा फोटो काढा. लोकं तुम्हाला महाराष्ट्रात उभं करणार नाहीत.

    लोकसभेला महाविकास आघाडीला 10 जागा मिळणार नाहीत, असं ते सांगत होते. आम्ही 31 जागा जिंकलो. सर्व्हे होता नरेंद्र मोदी 400 पार. पण साधं बहुमत मिळालं नाही. आता महायुतीचे लोकं कुठून सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. यांचा भरवसा नाही. पण मी सांगतो महाविकास विकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील.

    Sanjay Raut of Reciprocal Certificate for MVA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार