विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे.Sanjay Raut Mitra Parivar’s Rs 100 Crore Jumbo Covid Center Scam, Kirit Somaiya Accused
लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी ठरउक,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी यापूवीर्ही संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक असल्याचा आरोप केला होता.किरीट सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
राऊत म्हणाले होते, किरीट सोमय्या यांची मुले हरभरा विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात? माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजप नेत्यांनी तो ताब्यात घेऊन चालवावा. माझ्या मुली एखाद्या कंपनीत डायरेक्टर असतील तर काय चुकले. भाजप नेत्याच्या मुलासारखे ते अंमली पदार्थांचा व्यवसायात नाहीत.
Sanjay Raut Mitra Parivar’s Rs 100 Crore Jumbo Covid Center Scam, Kirit Somaiya Accused
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश निवडणुकीतील पैसा बाहेर निघू लागला, एकाच दिवसांत पकडले आठ कोटी रुपये
- छोटे राजा साहेब म्हणत अमृता फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा,
- महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची न्यूयॉर्कमध्ये विटंबना
- जिल्हा परिषदा, पंचायतीच्या प्रभागांच्या रचनांच्या तारखा जाहीर
- संत रामानुजाचार्य : स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जगातील सर्वात उंच आसनस्थ दुसरी मूर्ती!!