विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबरच आठवडाभराच्या आतच संजय राऊतांविषयी सहानुभूती दर्शक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण त्या भुवया नुसत्याच उंचावल्यात की संजय राऊत यांच्यासाठी शिंदे गटाचा दरवाजातील किलकिला झाला??, असा सवाल तयार झाला आहे.Sanjay raut is victim, claims newland gorhe
नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना अचानक संजय राऊत यांच्या विषयी सहानुभूती दर्शक उद्गार काढले. संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेतात. त्यातून ते सरकार विरोधात काही बोलत असतात. पण ते प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांना तसेच बोलायला पक्ष नेतृत्व सांगत असते. संजय राऊत यांच्या वक्तव्यातून काही गैरसमज जरूर होतात पण पक्ष नेतृत्व त्यांना बोलायला भाग पाडत असल्याने त्यांचा विनाकारण बळी गेला, असे उद्गार नीलम गोऱ्हे यांनी काढले.
पण नीलम गोरे यांच्या याच उद्गारांमुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. पण त्यांचे वक्तव्य केवळ राजकीय भुवया उंचावण्यापुरतेच मर्यादित राहिले की या वक्तव्यामुळे संजय राऊत यांच्यासाठी शिंदे गटाचे दरवाजे किलकिले झाले??, हा सवाल तयार झाला आहे.
40 आमदारांची राऊतांवर आगपाखड
कारण मूळातच शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार बाहेर पडताना त्यातील बहुतेक आमदारांनी संजय राऊत यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आजही अनेक आमदार संजय राऊत यांना धारेवर धरतात.
या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच संजय राऊत यांच्या विषयी सहानुभूती दर्शक उद्गार काढल्याने खुद्द संजय राऊत यांनाच आता एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश करायचा की काय आणि तो प्रवेश सोपा व्हावा म्हणून नीलम गोऱ्हे चाचपणी करत आहेत का??, असाही सवाल तयार झाला आहे.
नीलम गोऱ्हेंकडून परतफेड??
नीलम गोऱ्हे यांनी तर आपण संजय राऊत यांच्या विरोधात बोलणार नाही. कारण त्यांनी आपल्या आमदारकीसाठी प्रयत्न केले. उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकला, असे आधीच सांगून टाकले आहे. मग उद्धव ठाकरेंकडे आमदारकीसाठी टाकलेल्या शब्दाची नीलम गोऱ्हे संजय राऊतंसाठी एकनाथ शिंदे आणि कडे शब्द टाकून परतफेड करणार का??, असाही उपप्रश्न त्यांच्याच वक्तव्यातून तयार झाला आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळण्याची शक्यता आहे.
Sanjay raut is victim, claims newland gorhe
महत्वाच्या बातम्या
- ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंगवर 28% टॅक्स, सिनेमागृहात खाद्यपदार्थ स्वस्त होणार, GST कौन्सिलच्या बैठकीत निर्णय
- 5 राज्यांत मुसळधार पावसाचा कहर, 72 तासांत 76 मृत्यू; उत्तराखंडमध्ये मुसळधारेचा इशारा, अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू
- कर्नाटक विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोलीची मागणी, जेडीएस आमदाराचा दावा- भाजपलाही आक्षेप नाही
- ED डायरेक्टरचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणे बेकायदा, सुप्रीम कोर्टाचे नव्या नियुक्तीचे आदेश