वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोठडी वाढता वाढे, सुटका होई ना!!, उत्तरे देऊन झाली, प्रश्न तरी संपे ना!!, अशी संजय राऊत यांच्या अवस्था झाली आहे.
Sanjay Raut has been extended till September 5
संजय राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावे लागणार आहे. राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर, त्यांना सोमवारी ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. राऊत यांच्या अटकेनंतरही ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाडसत्र केले. गोरेगाव येथेही राऊत यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने, राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.
राऊतांनी कोणतीही तक्रार केली नाही
सोमवारी राऊत यांनी न्यायालयात कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. मागच्या वेळी राऊत यांनी न्यायालयातील गैरसोयींची तक्रार केली होती. त्यांना कोंदट रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे राऊत म्हणाले होते. त्यावर न्यायालयानेही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत यांना एसी रुममध्ये ठेवल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला होता. संजय राऊत यांना घरचे जेवण देण्यास परवानगी आहे, तसेच त्यांना कोठडीत वही पेनदेखील देण्यात आली आहे.
Sanjay Raut has been extended till September 5
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली, जम्मू – काश्मीर मध्ये “नवे” राजकीय घमासान घडवायला विरोधकांचा जमावडा!!; कसा तो वाचा!!
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत, कधीही होऊ शकते अटक
- शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार
- नोकरीची संधी : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्जाची शेवटची तारीख!!; असा करा अर्ज